सुरगाणा – ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसद’ आणि ‘महाराष्ट्र शासन – नाशिक विभागीय आयुक्त विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील एकूण ५४ तालुक्यात ‘ग्रामसंसद’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून यासंदर्भात सुरगाणा तालुक्यातही सरपंच – संसद आयोजनासाठी येथील तहसिलदार व गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन नियोजनाची चर्चा करण्यात आली.. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशाकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्णजी गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. ‘नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी’चे संचालक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे संयोजन मार्गदर्शक आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यात मार्च २२ च्या दुसऱ्या पंधरवड्यात ‘सुरगाणा तालुका – सरपंच संसदे’चे’आयोजन करण्यात येत आहे. सुरगाणा तालुक्यातील सर्व सरपंचाना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे.
‘सरपंच संसदे’त सुरगाणा प्रांत, सुरगाणा तहसीलदार व सुरगाणा गटविकास अधिकारी सरपंचांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.
कार्यक्रमाच्या अचूक नियोजनासाठी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, सहसमन्वयक प्रकाशराव महाले, सुरगाणा तालुका समन्वयक रमेश थोरात, तालुका संघटक व ठणगावचे सरपंच गोपाळराव धूम व तालुका सहसमन्वयक व चंद्रकांत भरसट यांनी सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार सचिन मुळीक व तालुका विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ यांची भेट घेतली व सविस्तर नियोजन केले. सुरगाणा तालुक्यातील सरपंच सौ.झंपाताई थोरात (ग्रामपंचायत भदर),सदस्य श्रीमती जानकी देशमुख(ग्रामपंचायत भदर), सरपंच निर्मला कामडी (ग्रामपंचायत मनखेडे), सरपंच शंकर चौरे (ग्रामपंचायत आंबेपाडा), सरपंच पुंडलीक पवार (ग्रामपंचायत नळकदरे), सरपंच काशिनाथ वाघमारे (ग्रापंचायत भवडा), सरपंच युवराज लोखंडे (ग्रामपंचायत रानपाडा), सरपंच सोमनाथ राभड (ग्रामपंचायत जांभूळपाडा), सरपंच संजय पडेल (ग्रामपंचायत बेडसे),सरपंच संजय जाधव (ग्रामपंचायत मांडवा), सरपंच पवन चौधरी (ग्रामपंचायत रानपाडा), सरपंच दौलत गावित (ग्रामपंचायत जांभुळपाडा झामल्यामाळ) हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुरगाणा तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘सरपंच संसद’ सुरगाणा पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न होणार आहे.