अश्विनी भाटवडेकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
छोट्या पडद्यावरील ‘सूर नवा’ या दर्जेदार कार्यक्रमाने आपले वेगळेपण जपले आहे. उत्तम सूत्रसंचालक, गुणी स्पर्धक आणि अभ्यासू परीक्षक यांमुळे या कार्यक्रमाने आपले वेगळे स्थान टिकवून ठेवले आहे. आता तर या कार्यक्रमाने आपल्या स्पर्धकांना एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. ही संधी म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं गाणं देण्याचा निर्णय कलर्स मराठी आणि एकविरा प्रॉडक्शन्सने घेतला आहे.
यंदा या कार्यक्रमाचं पाचवं पर्व आहे. नवोदित गायक – गायिकांना योग्य ते धडे देऊन त्यांच्या गाण्याला पैलू पाडण्याचे काम परीक्षक करत असतात. यामुळेच हा कार्यक्रम अल्पावधीत लोकप्रिय झाला. यंदाच्या पाचव्या पर्वात नवोदित कलाकारांना व्यसपीठ उपलब्ध करून देण्यासोबत पार्श्वगायनाची संधी देखील हा कार्यक्रम देणार आहे. आतापर्यंत कोणत्याही रिऍलिटी शो मधील हा अनोखा प्रयोग आहे. ‘सूर नवा’च्या या अनोख्या संकल्पनेचा मानकरी ठरला आहे सांगलीचा शुभम सातपुते. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार आणि गीतकार – कवी मिलिंद जोशी यांचे गाणे गाण्याची संधी शुभमला मिळाली आहे.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1559869851879243776?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
खरं तर प्रत्येक स्पर्धेचा एक विजेता असतो. अणि सहाजिक तोच सर्वांच्या लक्षात राहतो. पण या मंचाचे वेगळेपण असे की, प्रत्येक आठवड्याचा सर्वोत्तम गायक हा विजेता असणार आहे. त्याच्या नावावर त्याचे स्वतःचे गाणे होणार आहे. यापेक्षा या मंचाचे वेगळेपण काय असू शकते. आणि हे सगळे याच मंचावर घडत असल्याचा अभिमान असल्याचे परीक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ता यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1559814875651928065?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
‘सूर नवा’च्या या उपक्रमाबद्दल संगीतकार कौशल इनामदार म्हणतात की, ही फारच चांगली संकल्पना आहे. चित्रपट संगीतासोबतच भावगीतं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. मध्यंतरीच्या काळात हा ट्रेंड मागे पडला होता. पण ‘सूर नवा’च्या निमित्ताने त्याला उजाळा मिळत असेल तर ते निश्चितच अभिनंदनीय आहे. या गाण्यांसाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही एकविरा प्रॉडक्शनने केली. हे गाणं रेकॉर्ड करताना आम्हांला पुन्हा एकदा वयापेक्षा लहान झालो. त्याचा फारच आनंद आहे. या उपक्रमांतर्गत पहिले गाणे तयार असून लवकरच ते रसिक प्रेक्षकांसमोर येणार आहे.
https://twitter.com/ColorsMarathi/status/1557299794523340802?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
Sur Nava Dhyas Nava Reality Show Contestant will get this Opportunity
Colors Marathi TV Show Entertainment Music Singing