इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. दोन पानी पत्रात त्यांनी पुण्यात देखील खंडपीठ स्थापन करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
खा. सुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, शासनाने नुकतेच कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. परंतु आता याच धर्तीवर आता पुण्यात देखील खंडपीठ स्थापन करण्याची गरज आहे. पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज लक्षात येईल. पुणे शिक्षण, प्रशिक्षण व प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शहर आहे. याखेरीज येथील बार असोसिएशनने सातत्याने ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया याची आपण नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे करण्यास मंजुरी द्यावी.