इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शो मध्ये बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले.
सूरज मूळचा बारामतीचा असून तो टीकटॅाकमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण, असं असलं तरीही सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई – वडीलांना जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळा केला. बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच तो फेमस झाला. आता तो विजेता ठरल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत असतांना खा.सुळे यांनी सुध्दा कौतुक केले.
हे बक्षिस मिळणार
बिग बॅास मराठी सीझनचा विजेता अखेर सूरज चव्हाण ठरल्यानंतर त्याचे नशीबच पलटले आहे. त्याला विजेता झाल्यामुळे १४ लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. तसेच सूरजला पु.ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आले आहे. सूरजला एक गाडी देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे. पण, यापेक्षा सूरजला बक्षीस म्हणून सुप्रसिध्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर अगोदरच चर्चा
रविवारी निकाल घोषीत होण्याअगोदर सूरज चव्हाण विजेता होणार याची चर्चा सोशल मीडियावर अगोदरच होती. ती निकालाने खऱी ठरली. सूरजने घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली. याचेही सर्वांनी कौतुक केले. विशेष म्हणजे टॅाप ६ मधून त्याने बाजी मारली. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनजंय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॅास मराठीचे फआयनलिस्ट होते. त्यात त्याने बाजी मारली.