पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार-अजित पवार यांच्या पुणे येथील गुप्त भेटींवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या बैठकीबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुध्दा भाष्य़ केले. त्यांनी एका ओळीत या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले, नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण यांच्यात कोणी गल्लत करु नये.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात वाद होतात या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच ऐकमेकांशी भांडण झालेले नाही. गैरसमज नसावे, मी स्वत: काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलली आहे. त्यामुळे इतरांनी कोणी चिंता करु नये. सांगोल्यातली पवारसाहेबांची सभा आणि प्रेस बघितली असेल, तर मला संभ्रमाची स्थिती वाटत नाही.
आज अजित पवार यांनी दिले स्पष्टीकरण
कोल्हापूर – शरद पवार व अजित पवार यांच्या पुणे येथील गुप्त बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या भेटीचा इन्कार केला नाही. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे त्यांनी सांगत पुन्हा धक्का दिला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. मी उथळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता मला लपून जाण्याचे कारण काय ? असा सवालही त्यांनी केला. यावेळी ते म्हणाले की, पुण्याच्या बैठकीचे काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका.
दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी दिले होते हे स्पष्टीकरण
याअगोदर शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणात सांगितले होती की, माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नव्हती. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे. त्यामुळे मला कुणी भेटायला आले किंवा मी कुणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषय बनू शकत नाही. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय ? असेही ते म्हणाले.
supriya sule