मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्यानुसार, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे. तसेच, राज्यपालांच्या भूमिकेवर न्यायालयाने ओरखडे ओढले. त्यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे शिंदे सरकार कायम राहिले आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आहे.
शिंदे आणि फडणवीस हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आमचे सरकार कायदेशीर आहे हे न्यायालयाच्या आदेशानेही सिद्ध झाले आहे. आम्ही कुठलेही बेकायदेशीर काम केलेले नाही. न्यायालयाने निपक्षपातीपणे न्याया केला आहे. तसेच, यापुढे हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि जनतेची सेवा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1656579722351104000?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656562200990093318?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656562172712071169?s=20
Supreme Court Order Shinde Fadnavis Press Conference