नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात चार वर्षांची सेवा दिल्यानंतर सर्वात विनम्र आणि माणुसकी जपणारे न्यायाधीश न्यायमूर्ती अशोक भूषण ४ जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये सहभागी असलेले न्यायमूर्ती भूषण यांनी जाता जाता आणखी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोविडमुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा आदेश त्यांनी बुधवारी (३० जून) दिला. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मदत देणे शक्य नसल्याचा सरकारचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.
उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील रहिवासी न्यायमूर्ती भूषण यांनी या शतकातील सर्वात जटिल अयोध्या जन्मभूमी वादाच्या प्रकरणात सक्रिय भूमिका निभावून वकिलांना कठोर प्रश्नही विचारले आहेत. काही वकिलांनी त्यांच्यावर कटाक्ष टाकला तरी त्यांनी संयमाने स्मित हास्याने त्यांचा दावा ऐकून घेतला.
बुधवारी त्यांना न्यायाधीश आणि कर्मचार्यांनी समारंभ आयोजित करून निरोप दिला. या समारंभात ते भावूक झाले आणि कर्मचार्यांची गळाभेट घेतली. एका न्यायाधीशाकडून अशी कृती करणे आश्चर्याची गोष्ट आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांसमोर विनाकारण कर्मचारी उभे राहू शकत नाहीत. न्यायमूर्ती भूषण यांनी गेल्या वर्षी कोविडमुळे घराकडे पायी जाणार्या कामगारांच्या प्रश्नात दखल देऊन त्यांना विनातिकीट घरी पाठविण्याचे आदेश दिले होते. मजुरांना देशात कुठेही अन्नधान्य मिळावे यासाठी एक रेशनकार्ड एक देश ही योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश त्यांनी मंगळवारी सरकारला दिले होते.
१३ मे २०१६ मध्ये न्यामूर्ती भूषण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यांचे काही निर्णय महत्त्वपूर्ण आहेत.
आधारची वैधता ः सप्टेंबर २०१८ मध्ये आधारला संवैधानिक रुपाने वैध असल्याचा निर्णय दिला. परंतु बँक खाते, शाळा प्रवेश आणि फोनद्वारे आधार क्रमांक जोडण्याच्या काही तरतुदी रद्द केल्या.
मागासवर्गीय आरक्षण ः काही दिवसांपूर्वी २९ वर्षांपूर्वीच्या जुन्या निर्णयाला मोठ्या पीठाकडे सुपूर्द करण्याची मागणी करणार्या याचिकेला फेटाळून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत निश्चित केली.
एक देश एक रेशनकार्ड ः जेवणाचा अधिकार घोषित केला.
न्यायमूर्ती भूषण यांची कारकीर्द
– १९७९ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून विधी विषयात पदवी प्राप्त केली.
– ६ एप्रिल १९७९ रोजी उत्तर प्रदेश बार काउंसिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली.
– २४ एप्रिल २००१ मध्ये अलाहाबादमध्ये उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश झाले.
– १० जुलै २०१४ मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
– मार्च २०१५ मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली.
– १३ मे २०१६ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
—
न्यामूर्ती भूषण नेहमीच अनमोल सहकारी राहिले आहेत. त्यांचे निर्णय ते कल्याणकारी आणि मानवतावादी असल्याचे पुरावे आहेत. पीठ आणि समितत्यांमध्ये त्यांची उपस्थिती खूपच विश्वासदायक होती. ते महान व्यक्ती आहेत. त्यांचा हा गुण कर्तव्य निभावताना करताना प्रतिबिंबित होत होता.
– एन. व्ही. रमण, मुख्य न्यायाधीश