विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना संसर्गाला थोडा ब्रेक लागला असला तरी अद्याप म्हणावे तसे लसीकरण झालेले नाही. शहरांसह ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसह राज्य सरकारांनाही चिंता सतावत आहे. आता यामध्ये न्यायाधीशांचीही भर पडली आहे. कसेही करून लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी मागणी केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी एका सुनावणीदरम्यान देवाजवळ प्रार्थना केली. ते म्हणाले, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात पूर्वीसारखी फिजिकल सुनावणी सुरू व्हावी आणि न्यायालय पुन्हा सुरू व्हावे.
न्यायालयाने एका जामीन अर्जावर सुनावणी करत होते. याचिकाकर्त्याच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे पीठ म्हणाले, की पुढच्या वेळी या प्रकरणाची सुनावणी होताना सर्व लोक आमने सामने उभे रहावे. मार्च २०२० पासून सर्वोच्च न्यायालयात व्हर्च्युअल माध्यमाद्वारे सुनावणी सुरू आहे.
एका वेगळ्या प्रकरणात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कोविड संसर्गादरम्यान विलगीकरणातील आपले अनुभव सांगतिले होते. या सुनावणीदरम्यान मास्क आणि लशीबाबत चर्चा सुरू झाली. तेव्हा तेथे वकील अभिषेक मनुसिंघवी, महाअधिवक्ता तुषार मेहता उपस्थित होते. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, की ते १८ दिवस विलगीकरणात राहिले होते. ते आणि त्यांची पत्नी दोघांनाही बाधा झाली होती. आपला वेळ जाण्यासाठी त्यांनी पुस्तके वाचली. केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ताषेरे ओढले होते. लसीकरणाच्या चुकांवरही त्यांनी बोट ठेवले होते.