नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने आज अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुजरात दंगलींबाबत दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांना आता अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई बंद करण्यात येत आहे. गुजरात दंगलीच्या ९ पैकी ८ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली असल्याचे न्यायालयाने सांगितले. याशिवाय बाबरी मशीद पाडण्याशी संबंधित अवमान खटलाही बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण आणि पत्रकार तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोघांनीही माफी मागितली आहे. खरे तर २००९ मध्ये एका मुलाखतीत प्रशांत भूषण यांनी माजी आणि विद्यमान न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे दोघांविरुद्धचा खटला बंद होऊ शकतो. त्यांची मागणी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने मान्य केली.
नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशांत भूषण आणि तरुण तेजपाल यांना नोटीस बजावण्यात आली होती. यावर प्रशांत भूषण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, ‘मी २००९ मध्ये तहलकाला दिलेल्या मुलाखतीत कोणत्याही विशिष्ट गोष्टीसाठी भ्रष्टाचार हा शब्द वापरला नव्हता. मी हे एका व्यापक संदर्भात म्हटले आहे. आर्थिक भ्रष्टाचाराशी त्याचा काहीही संबंध नाही. यामुळे जर कोणी न्यायाधीश किंवा त्यांचे कुटुंब दुखावले गेले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. प्रशांत भूषण यांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19
Supreme Court Gujrat Riot Babri Mosque Demolition