नवी दिल्ली – अमरावती येथील खासदार नवनीत राणा याचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द केल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. येथे त्यांना दिलासा मिळाला आहे. या स्थगितीमुळे खा. राणा यांचे खासदारकीवरील संकट तूर्त टळले आहे.
अमरावती लोकसभेच्या एससी राखीव मतदार संघातून खा. राणा या निवडून आल्या आहे. पण, निवडणूकीनंतर त्यांच्या विरोधात माजी सेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला. या निकालात दोन लाखांचा दंड आणि सहा आठवड्यात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खा. राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली येथे त्यांना दिलासा मिळाला.
भाजपला समर्थन
खा. नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या समर्थनातून निवडून आल्या होत्या. पण, त्यांनी निवडून आल्यानंतर भाजपला समर्थन केले आहे.