नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केवळ मुलेच नव्हे तर मुलींची देखील जबाबदारी घेणे पालकांचे विशेषतः वडिलांचे कर्तव्यच असते, त्या कर्तव्यापासून त्यांना दूर जाता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाने वडिलांकडून मुलीला भरणपोषण देण्याच्या प्रकरणावर सुनावणी करताना म्हटले की, मुली कोणावरही ओझे नसतात. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
कारण वडिलांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलाने ही मुलगी वडिलांना एक ओझे असल्याचे सांगितल्यानंतर ही टिप्पणी केली. कारण आई-वडीलच मुलांना जन्म देतात त्यामुळे आपली मुले ही पालकांसाठी ओझे होऊ शकत नाही तर त्यांना सांभाळण्याचे आणि त्यांचे शिक्षण भरण पोषण करण्याचे कर्तव्य पालकांना विशेषता वडिलांना पूर्ण करावेच लागते असेही न्यायालय म्हटले.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घटनेच्या कलम 14 चा संदर्भ देत ही टिप्पणी केली. सदर प्रकरण हे कलम कायद्यासमोर सर्व समान असल्याची हमी देते. या प्रकरणी खंडपीठाकडून सांगण्यात आले की, संबंधित मुलगी वकील आहे आणि तिने न्यायिक सेवेची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सदर मुलीने तिच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून ती तिच्या वडिलांवर अवलंबून राहू नये. तसेच वडिलांकडून सात दिवसात मुलीला ५० हजार रुपये मिळावेत, आदेशही खंडपीठाने दिले.
Supreme Court Father Daughter Burden Legal