सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाच वर्षे एकत्र होते, मग बलात्कार कसा? सुप्रीम कोर्टाने फेटाळली महिलेची याचिका…

by India Darpan
ऑगस्ट 26, 2023 | 5:28 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Court Justice Legal

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेम प्रकरणात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर पुरुषाने लग्नाला नकार दिला की त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली जाते, अशी अनेक प्रकरणे न्यायालयात येतात. आणि या प्रकरणांमध्ये बहुतांश वेळा महिलेच्या बाजुने निकाल लागतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात महिलेची याचिका फेटाळून लावली आहे.

ग्वाल्हेरमधील एक जोडपे गेली पाच वर्षे एकत्र आहे. आज महिलेचे वय ३० आणि पुरुषाचे वय ३१ आहे. पाच वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते, त्यात त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पाच वर्षे एकत्र राहिले आणि त्यानंतर पुरुषाने तिला लग्नाला नकार दिला. त्याविरोधात तिने पोलिसांत तक्रार दिली. लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर लग्नाला नकार दिला, असे सांगत तिने बलात्काराची तक्रार दाखल केली. मध्यप्रदेश उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळून लावली. तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने मात्र तिला चांगलेच सुनावले. पाच वर्षे एकत्र होते, मग बलात्कार कसा म्हणता येईल, असा सवालही न्यायालयाने केला. न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू धुलिया यांनी १८ एप्रिलच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेतली. शारीरिक संबंध दीर्घकाळ राहून त्याचे रुपांतर विवाहात झाले नाही तर त्याला बलात्कार कसे म्हणायचे, असा महत्त्वाचा सवालही सर्वोच्च न्यायालयाने महिलेला केला आणि महिलेची याचिका फेटाळून लावली.

बलात्काराचे लेबल लावू नका
प्रत्येक अयशस्वी नातेसंबंधांना बलात्काराचे लेबल लावू नका, या शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले. सहमतीने व सातत्याने शारीरिक संबंध ठेवण्याची निवड करणाऱ्या जोडप्यांनी आपले लग्न होण्याची शक्यता कमी आहे, अशी मानसिक तयारी ठेवायला हवी, असेही न्यायालय म्हणाले.

महत्त्वाची प्रकरणे मागे पडतात
अशा प्रकरणांमुळे लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातील खऱ्या खटल्यांसाठी अडचणी निर्माण होतात. खऱ्या खटल्यांना सामोरे जाणे न्यायालयाला अडचणीचे ठरते. लैंगिक अत्याचाराच्या वास्तविक प्रकरणांना अशा उदाहरणांमुळे हानी पोहोचू शकते, असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले.

Supreme Court Couple Relationship Rape Claim Reject Petition

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

म्हणे ५ लाखापर्यंत मोफत उपचार होणार… अशी आहे सद्यस्थिती… राज्य सरकारचा कारभार तोंडघशी…

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या घोषणा… परदेशातून थेट इस्रोमध्ये… (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Capture 23

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या घोषणा... परदेशातून थेट इस्रोमध्ये... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011