मुंबई – सुपरस्टार आणि अॅक्शन मास्टर रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, रजनीकांत हे त्यांची कन्या सौंदर्या हिचे अनोखे मोबाईल अॅप लॉन्च करणार आहेत. त्यामुळे ही बाब सध्या सर्वत्र चर्चेची बनली आहे. या अॅपविषयी आता जाणून घेऊया..
रजनीकांत म्हणाले की, सोमवार हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग असेल. जेव्हा त्यांना फाळके पुरस्कार मिळेल. तेव्हा हा दिवस त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचा असेल, कारण त्यांची मुलगी सौंदर्या विष्णन व्हॉईस-आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करेल आणि म्हणेल की हे सर्वांसाठी “उपयुक्त अॅप” असेल. सोमवार माझ्यासाठी दोन खास गोष्टी घेऊन येत आहे, एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे रसिकांचे प्रेम आणि पाठिंबा यामुळे मला भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला जात आहे. तर दुसरा खास प्रसंग म्हणजे हा दिवस तितकाच महत्त्वाचा ठरेल, कारण माझी मुलगी सौंदर्या, हिने तिच्या स्वतंत्र प्रयत्नांनी जनतेसाठी हूटे नावाचे अतिशय उपयुक्त अॅप बनवण्यात पुढाकार घेतला आहे. देशातील हे पहिले व्हॉईस आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज, लॉन्च होणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून सर्वजण आता त्यांचे विचार, इच्छा आणि कल्पना त्यांच्या आवाजाद्वारे व्यक्त करू शकतात. तसेच ते त्यांच्या आवडीच्या कोणत्याही भाषेत लिहू शकतात. रजनीकांत यांनी आणखी सांगितले की, सर्वप्रथम मी माझ्या आवाजात या प्रकारचे पहिले अॅप लाँच करणार आहे. तसेच अॅप वापरकर्ते या अॅपद्वारे 60 सेकंदांचा व्हॉइस संदेश पाठवू शकतील. याशिवाय, त्यात पार्श्वभूमी संगीत आणि प्रतिमा देखील टाकल्या जाऊ शकतात.