मुंबई – राजकारण हे भल्या भल्यांना जमत नाही. त्यामुळेच अनेक जण त्यापासून कोसो दूर राहतात. दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टी ते राजकारण हा प्रवास तर मोठा पायंडाच आहे. आणि याच मार्गावर जाण्याचा निर्धार करणारे सुपरस्टार रजनीकांत यांनी मात्र आता युटर्न घेतला आहे. राजकारणात न येण्याचे त्यांनी जाहिर केले आहे. विशेष म्हणजे, याचाच एक भाग म्हणून त्यांनी रजनी मक्कल मंद्रम हा आपला पक्षही विसर्जित करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या नजिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी रजनीकांत यांनी एका पत्राद्वारे आपल्या चाहत्यांना राजकारणाबाबत माहिती दिली होती. रजनीकांत यांचे लाखो चाहते असून त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहते निराश झाले आहेत.
— Rajinikanth (@rajinikanth) July 12, 2021