विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आज २६ मे रोजी सायंकाळी पूर्ण चंद्रग्रहणाचे लोभस दृश्य पाहिल्यानंतर एक दुर्लभ मोठ्या आकाराचा चंद्र (सुपर ब्लड मून) दिसणार आहे. अतिशय दुर्मिळ असा हा नजारा आहे.
२६ मेस रात्री सूर्य, पृथ्वी, चंद्र सरळ एका रेषेत येणार असून, पृथ्वीवरून पूर्ण चंद्र दिसणार आहे. थोडा वेळ ग्रहणकाळ असेल. पृथ्वीच्या जवळून फिरताना चंद्र काही काळ पृथ्वीच्या सावलीतून माग्रक्रमण करणार आहे. त्याच वेळी पूर्णपणे ग्रहण लागणार आहे.
पूर्व आशिया, पॅसिफिक महासागर, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भाग आणि ऑस्ट्रेलियातून पूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रावर अंशतः ग्रहण दुपारी जवळपास सव्वा तीनला सुरू होणार असून सायंकाळी सहा वाजन २२ मिनिटांनी समाप्त होईल.
भारतात बहुतांश भागात पूर्ण ग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्वेकडील क्षितिजाच्या खाली असेल. त्यामुळेच देशातील खगोलप्रेमींना पूर्ण चंद्रग्रहण पाहता येणार नाही. परंतु पूर्व भारतात अंशतः चंद्रग्रहणाचा शेवटचा टप्पा खगोलप्रेमी पाहू शकणार आहेत. पूर्वेला चंद्रोदय होताना आकाशाच्या जवळच चंद्रग्रहण पाहता येईल.










