पुणे – काही महिन्यापूर्वी भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (VI) या दूरसंचार कंपनीने त्यांच्या स्वस्त प्लॅनसह एसएमएस देणे बंद केले. यामुळे, अनेक मोबाईल वापरकर्ते ग्राहक आता कोणता प्लान खरेदी करायचा याबद्दल साशंक होते. परंतु आता भारतातील मोबाईल वापरकर्त्याला ग्राहकांना 100 रुपयांच्या आतच VI चे प्रीपेड प्लॅन मध्ये भरपूर फायदे मिळणार आहेत.
एअरटेल आणि VI कंपन्या मोबाईल वापरकर्त्यां ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक योजना देतात, त्यामुळे अनेक फायदे आणि अधिक लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना यापुढे जास्त पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही, कारण कंपनीकडे आणखी काही स्वस्त प्लॅन असून ते अजूनही डेटा आणि व्हॉईस कॉलिंगसह अतिरिक्त फायदे देणार आहेत. 100 रुपयांच्या अंतर्गत VI चे प्रीपेड प्लॅन वापरकर्त्याला कोणते फायदे मिळतात ते पाहू या…
९९ प्लॅन
या प्रीपेड प्लान अंतर्गत, VI आपल्या ग्राहकांना एकूण 1GB डेटासह अमर्यादित कॉलिंग ऑफर करत असून या योजनेमध्ये कोणतेही अतिरिक्त एसएमएस लाभ समाविष्ट नाहीत. मात्र ते प्लान 18 दिवसांच्या वैधतेसह येतात.
९५ प्लॅन
95 रुपयांच्या प्लॅनसह, कंपनी मोबाईल वापरकर्त्यांना मर्यादित वैधता टॉकटाइम 74 रुपये आणि 200 एमबी डेटासह 56 दिवसांच्या एकूण वैधतेसह ऑफर करते. या योजनेअंतर्गत, स्थानिक आणि राष्ट्रीय कॉल 2.5 पैसे प्रति सेकंद आकारले जातात. या योजनेत मोफत एसएमएस लाभ नाही.
९८ प्लॅन
VI चा 98 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो आणि वापरकर्त्यांना 6GB डेटा देते. तसेच हा प्लॅन दुहेरी डेटा ऑफरसह देण्यात येतो, म्हणजे वापरकर्त्यांना एकूण 12GB हायस्पीड डेटा मिळेल. मात्र या योजनेत कोणताही कॉल किंवा एसएमएस लाभ नाही.
७९ प्लॅन
79 रुपयांच्या प्रीपेड योजनेअंतर्गत, VI ग्राहकांना 64 रुपयांचा मर्यादित वैधता टॉकटाईम, स्थानिक किंवा राष्ट्रीय कॉल 1 पैसे प्रति सेकंद आणि 200 MB हाय-स्पीड डेटा देते. तसेच हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो.
६५ प्लॅन
VI चा 65 रुपयांचा प्रीपेड प्लान एकूण मर्यादित वैधता टॉकटाईम 52 रुपये आणि 100mb हायस्पीड डेटासह देण्यात येतो. या योजनेमध्ये कोणत्याही एसएमएस लाभांचा समावेश नाही. मात्र तो 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो.