नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजासाठी काही करावे या विधायक हेतूने तयार झालेल्या सुपर ३० ग्रुपच्या वतीने समाजाची गरज लक्षात घेऊन शवपेटी घेण्यात आली व ती पेटीचे गरजवंतांच्या कामी येण्यासाठी लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे हस्तांतरण करण्यात आल्याची माहीती सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन, मधुकर ब्राह्मणकर, सुपर ३० ग्रुपचे प्रसाद बागड, अभय कोतकर यांनी दिली.
नाशिकमधील आपल्यातीलच ३० युवा समाजबांधवांनी काहीतरी विधायक कार्य आपल्या हातून घडावे व आपली मदत समाजाच्या कामी पडावी या हेतूने सुपर ३० ग्रुपच्या माध्यमातून सध्याच्या काळात गरजेची बनलेली व ऐन वेळेवर खूप धावपळ करूनही लवकर उपलब्ध न होणारी ‘शीत शव पेटी’ घेऊन या पेटीची सुरक्षितता व तिची योग्यरीत्या हाताळणी व्हावी या हेतूने सन्मित्र मंडळास सदर पेटी आज सुपूर्द केली.
नातेवाईकांचा झालेला विस्तार, परदेशात शिक्षण घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ या गोष्टींचा सारासार विचार करून या शीत शव पेटीची निर्माण झालेली आवश्यकता लक्षात घेऊन सुपर ३० या ग्रुपने ही पेटी घेण्याचे ठरवले. ३० युवकांनी त्यांच्या वैयक्तिक योगदानातुन उपलब्ध करून दिली.
या हस्तांतर उपक्रमाप्रसंगी सन्मित्र मंडळाचे विश्वस्त संजय येवले, भूषण महाजन ,सचिन बागड, गणेश येवला, विनोद दशपुते, शरद वाणी,नीलेश मकर,जितेंद्र येवले,मनोज शिनकर, किशोर सोनजे, भूषण सोनजे. गणेश कोठावदे, उमेश महाजन, प्रशांत मोराणकर, भिला वाणी, विशाल वाणी, पंकज कोठावदे, भूषण पाटकर, अमित कोतकर, संजय दुसे, सुनिल येवले, महेंद्र अमृतकर, विवेक वाणी यांचेसह सुपर ३० ग्रुपचे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.