विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
आधुनिक काळात वाहनांचे अत्याधुनिक प्रकार येत आहेत. विशेषत: कारमध्ये अत्यंत आकर्षक मॉडेल सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातच सनरूफ म्हणजेच पारदर्शक टफ किंवा छ्त असलेल्या कारला चांगली मागणी आहे. कारण या कारमधून विविधरंगी आकाश दर्शनतर घडतेच, मात्र निसर्गाचे नाविन्यपूर्ण रूपही न्याहाळता येते. परंतु या कार महागड्या असाव्यात, असे ग्राहकांना वाटते, परंतु आपल्या बजेटमध्ये या कार उपलब्ध आहेत.
भारतीय कारमध्ये सनरूफ हे प्रीमियम वैशिष्ट्य मानले जाते, त्यामुळे बहुतेक कार ग्राहकांना असे वाटते की सनरूफ असलेली कार खरेदी करणे खूप महाग आहे. तथापि, आता काही कार निर्माते आता परवडणाऱ्या कारमध्येही सनरूफ ऑफर करत आहेत, ग्राहकांना कमी पैसे खर्च करून कारमध्ये चांगला व आनंददायी अनुभव मिळू शकेल.
किया सोनेट : किया सोनेटमध्ये ग्राहकांना १.२ -लीटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल, १.०-लिटर टर्बो टी-जीडीआय पेट्रोल आणि १.५ -लिटर डिझेल इंजिनची निवड करता येते. यात ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड आयएमटी, ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर, ७-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिकचा पर्याय मिळतो. तसेच यामध्ये ग्राहकांना सनरूफचा पर्यायही मिळतो. किया सोनेटची एक्स-शोरूम किंमत ६ लाख ७९ हजार रुपये आहे.
ह्युंदाई आय २० : ह्युंदाई आय २० मध्ये कंपनीला १.२ कप्पा पेट्रोल इंजिन, १.५ लीटर युटू सीआरडीआय डिझेल इंजिन आणि १.० लीटर कप्पा टर्बो जीटीआय पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. सदर इंजिन अनुक्रमे ५ स्पीड मॅन्युअल, इंटेलिजंट व्हेरिएबल ट्रान्समिशन, ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि डीसीटी ट्रान्समिशनशी जुळलेले आहेत. तसेच या कारमध्ये सनरूफ देखील देण्यात आले आहे. ह्युंदाई आय २० ही कार ६,८५,१०० रुपयांच्या किंमतीपासून खरेदी करता येते.
ह्युंदाई व्हेन्यू : ह्युंदाई व्हेन्यू ला ३ इंजिनच्या पर्यायांसह ऑफर केले आहे. त्यापैकी एक १.५L ४-सिलेंडर टर्बो डिझेल BS6 इंजिन आहे तसेच १.० लीटर बीएस ६ टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. तिसऱ्या इंजिन हे १.२ लिटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. ह्युंदाई व्हेन्यूमध्ये ग्राहकांना सनरूफ सुविधा देण्यात आली आहे. या कारची किंमत ६,९२,१०० रुपयांपासून सुरू होते. टाटा नेक्सन: २०२१ मध्ये आलेली
टाटा नेक्सन – १.२-लिटर टर्बो-पेट्रोल आणि BS6 अनुरूप १.५-लिटर डिझेल इंजिनसह तयार केली आहे. यात दोन्ही इंजिन ११०hp ची समान शक्ती निर्माण करतात आणि अनुक्रमे पेट्रोलमध्ये १७०Nm पीक टॉर्क आणि डिझेलमध्ये २६०Nm निर्माण करतात. एसयूव्ही नेक्सनमध्ये ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा एएमटी गिअरबॉक्स असू शकतो. टाटा नेक्सनची सुरुवातीची किंमत ७ लाख १९ हजार रुपये आहे.
….