विशेष प्रतिनिधी, मुंबई
बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या मुलांसोबत वेळ घालवणारी सनी मुलांसोबतचे फोटो, त्यांच्या गप्पा चाहत्यांसोबत शेअर करते. त्यांच्यातील हे बाँडिंग चाहत्यांना देखील आवडतं.
सनी लिओनीने नुकताच तिच्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करत, त्याच्यासोबत झालेलं बोलणं टाकलं आहे. सनीने मुलगा अशरला विचारले की, तुला इतके सुंदर कोणी बनवलं? त्यावर अशरने मम्मी, तू, असं उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून सनी अत्यंत भावूक झाली. कामावर जाताना मी अशरला हा प्रश्न विचारला. आणि त्याचे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. मला त्याच्यासोबत अजून वेळ घालवायची इच्छा आहे.
दरम्यान, काही काळापूर्वी सनी लिओनीने कोरोना लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. यासाठी वेळेवर नोंदणीकरण करण्यासही सांगितले होते. हे आवाहन करताना तिने स्वत:चा एक इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला. यात ती अत्यंत सुंदर दिसते आहे.
आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना तिने ‘चला, कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान देऊ या. लसीकरणाची वेळ आली आहे. स्वत:ला, आपल्या निकटवर्तीयांना तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना या लढाईत लढण्यासाठी बळ मिळावे म्हणून लसीकरण करून घ्यावे.