इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्टार कीड असलेली बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल हे खूप दिवसांपासून एकत्र आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. भलेही केएल राहुल आणि अथिया सार्वजनिकरित्या एकमेकांबद्दल बोलणे टाळतात, परंतु दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अथिया आणि केएल राहुल लग्न करणार असल्याचा दावा बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे. मात्र आता अथिया शेट्टी व केएल राहुल लवकरच अडकणार लग्नबेडीत अडकण्याचे संकेत अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी दिले आहेत.
सुनील शेट्टी यांची कन्या अथियाने २०१५ मध्ये ऍक्शन फिल्म ‘हिरो’मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये अथियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. अथिया आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल हे खूप दिवस एकत्र आहेत. चाहत्यांना अथिया आणि राहुलची जोडी खूप आवडते. अथिया शेट्टी अनेकदा केएल राहुलसोबत क्रिकेट टूरवर जाताना दिसते. दोघेही एकमेकांना ३ वर्षांपासून डेट करत आहेत.
अथिया आणि राहुल त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. राहुलनं व्हॅलेंटाईन डेनिमित्त अथियासोबतचा फोटो शेअर केला होता. आता त्यांच्या लग्नाबाबत काय प्लॅनिंग आहे, यावर सुनील शेट्टीने उत्तर दिले आहे. एका मीडिया पोर्टलशी संवाद साधताना सुनील शेट्टी यांना मुलीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ‘मला वाटतं ते मुलांनी ठरवावं. राहुल सध्या आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूरमध्ये व्यस्त आहे. जेव्हा मुलांना ब्रेक मिळेल, तेव्हाच लग्न होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा आहे. त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले आहे. केएल राहुल सध्या झिम्बाब्वेसोबतच्या क्रिकेट सामन्यात व्यस्त आहे. ही जोडी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये अथियाला केएल राहुलसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘मी अशा प्रश्नांना उत्तर देत नाही. अशा प्रश्नांवर मी हसते. लोकांना जो विचार करायचा आहे तो करू देत.’, असे उत्तर अथिया हिने दिले.
Sunil Shetty Says Athiya Shetty and K L Rahul Wedding Plan