शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात या शाळा राज्यातून प्रथम…५१ लाख रुपयांचे पारितोषिक

ऑक्टोबर 13, 2024 | 12:22 am
in संमिश्र वार्ता
0
mazi shala e1728759096143

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम आले आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

मंत्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येदेखील झाली आहे.

मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन यावर्षीदेखील या अभियानाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमासदेखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळया झाडून हत्या…दोन जणांना पोलिसांनी घेतली ताब्यात

Next Post

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार…१४ ऑक्टोबरला या कार्यक्रमाचे आयोजन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष Invitation 768x1086 1 e1728759443131

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार…१४ ऑक्टोबरला या कार्यक्रमाचे आयोजन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011