नाशिक – प्रसिद्ध क्रीडा पत्रकार व समालोचक श्री सुनंदन लेले यांचे नाशिक मध्ये एका कार्यक्रमासाठी आगमन झाले असता नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. नाशिकच्या होतकरू तरुण खेळाडूंना त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. क्रिकेट खेळासाठी फिटनेसचे महत्व त्यांनी समजावून सांगितले . त्यांना रसिका शिंदे हिने अनेक प्रश्न विचारले. मुलींच्या क्रिकेटमध्ये आता खूप बदल होत आहेत. महिला आयपीएल सुरू होत आहे. त्यामुळे खूप संधी उपलब्ध होणार आहेत. तिकडे चांगले लक्ष देणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. सध्या राज्यस्तरावर खेळणार्या खेळाडूंनी आणखी वरच्या स्तरावर खेळण्यासाठी काय काय गोष्टी अवलंबिल्या पाहिजेत याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
खेळा प्रति आपली निष्ठा, एकाग्रता आणि सातत्य अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी सेक्रेटरी समीर रकटे, महाराष्ट्र २५ वर्षांखालील संघाचे ट्रेनर विनोद यादव, एसएसके वर्ल्ड चे शैलेश कुटे व `सकाळ` चे संपादक उपस्थित होते. नाशिकचे क्रिकेट खेळाडू रसिका शिंदे, आयुष ठक्कर, लक्ष्मी यादव , प्रतीक तिवारी, प्रसाद दिंडे, साहिल पारख या उपस्थित असलेल्या खेळाडूंना त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या समालोचन व पत्रकारितेच्या काळातील सेहवाग, सचिन सारख्या दिग्गज खेळाडुंसह अनेक किस्से त्यांनी सांगितले.