नशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमती लांडे: समग्र कविता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत गंगापूर रोड येथील डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) येथे होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राजन गवस यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब कसबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून रंगनाथ पठारे, प्रभाकर कोलते, सयाजी शिंदे, किशोर कदम हे उपस्थितीत राहणार आहे. प्रास्तविक सरबजीत गरजा, संपादनाविषयीची माहिती कविता मुरुमकर हे देणार आहे. यावेळी कविता वाचन सुमती लांडे या करणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश होळकर करणार आहे. विश्वास ग्रुप यांच्या सौजन्याने कॅापर कॅाइन (दिल्ली) , रेड स्पॅरो मीडिया हाऊस (दिल्ली) इंडिया दर्पण (नाशिक) सोशल नेटवर्कींग फोरम (नाशिक ) या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज सकाळपासून या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर करण्यात आले आहे.