मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उन्हाळी सुटीत उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. दर आठड्याला असलेली ही सुपरफास्ट रेल्वे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते उत्तर प्रदेशातील महू या दरम्यान असणार आहे. ही रेल्वे २८ एप्रिलपासून ३० जून पर्यंत सेवा देणार आहे. या रेल्वेच्या एकूण १० फेऱ्या असतील.
दर गुरुवारी सव्वा पाच वाजता ही सुपरफास्ट रेल्वे एलटीटी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी १ वाजता महू येथे पोहचेल. तसेच, दर शनिवारी ही रेल्वे महू येथून सायंकाळी पाडेपाच वाजता निघेल आणि रविवारी दुपारी १२ वाजता ती एलटीटीला पोहचेल.
या रेल्वेला कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, विरांगना लक्ष्मीबाई स्टेशन ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी येथे थांबा असेल.
या रेल्वेमध्ये एक एसी कोट, २ टू टायर एसीचे कोच, एसी ३ टायरचे ४, स्लीपरचे १० आणि जनरलचे ७ कोच असतील. या रेल्वेसाठीचे बुकींग २४ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी http://www.irctc.co.in या वेबसाईवर बुकींग करता येईल. तर, अधिक माहितीसाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.