ठाणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्या एप्रिल महिन्याच्या मध्य अवधीत उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून अद्याप मे महिना बाकी आहे. त्यामुळे साधारणत : येत्या दीड महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून देशभरात उष्णतेची जणू काही लाटच आली आहे. सहाजिकच नागरिक आणि उकाड्या पासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना यांचा अवलंब करीत असतात. त्याचप्रमाणे आहारात देखील थंड पदार्थांचा समावेश करतात.
उन्हाळ्यात आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. सध्याच्या काळात अनेक जण अन्नापेक्षा द्रव पदार्थाच्या आहाराकडे अधिक लक्ष देतात. आणि रस पिण्यास प्राधान्य देतात. ज्यूस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो तसेच झटपट ऊर्जा मिळते.
अशा परिस्थितीत अननसाचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. अननस हे एक फळ असून ते सुगंध आणि आंबट-गोड चवीसाठी ओळखले जाते. त्याचा रसही खूप चवदार असतो. एवढेच नाही तर उन्हाळ्यात ते प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या…
अननसाचा रस वजन कमी करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. अननसमध्ये व्हिटॅमिन सी तसेच लठ्ठपणाविरोधी गुणधर्म भरपूर असतात, ते वजन नियंत्रित करण्यास किंवा कमी करण्यास मदत करतात.
कोरोनाच्या काळात नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप लक्ष दिले. उन्हाळ्यात अननसाचा रस चवीसोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. अननसमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळतात.
अननसमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. अननसात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते, त्यामुळे हाडे आणि ऊतींना ताकद मिळते.
जर वारंवार कोरडेपणा आणि ओठ फुगण्याचा त्रास होत असेल तर अननसाचा रस जरूर प्या.
अननसात असलेले बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए सांधेदुखी, पेटके इत्यादी कमी करू शकतात. याशिवाय यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, ते सूज कमी करण्यास देखील मदत करतात.