बुधवार, ऑक्टोबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उन्हाळ्यामध्ये त्वचा तेजस्वी व कोमल राखण्यासाठी अशी घ्या काळजी

एप्रिल 12, 2023 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
Winter Skin scaled e1674215695159

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कडाक्याचे ऊन त्वचेसाठी असह्य ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सनबर्न्स, हायपरपिग्मेंटशन, डिहायड्रेशन, त्वचा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे, चिडचिड होणे अशा काही त्वचेच्या समस्या उद्भवतात. आर्द्रता उच्च असलेल्या ठिकाणी तेलकट त्वचा अधिक तेलकट होऊ शकते, तर कोरडी त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. याव्यतिरिक्त, आपल्या त्वचेला दररोज प्रदूषण, धूळ व दुर्गंधी यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. द बॉडी शॉप इंडियाच्या लर्निंग अकॅडमी विभागाचे डीजीएम श्री रजत माथूर यांनी उन्हाळ्यामध्ये त्वचा तेजस्वी व कोमल राखण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स इथे दिल्या आहेत.

थंडावा/सुखद आराम देणारे घटक असलेल्या उत्पादनांचा वापर करा:
उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे चट्टे व पुरळ येणे सामान्य आहे. म्हणून कोरफड, चहाच्या झाडाचे तेल, काकडी, समुद्री शैवाल आणि गुलाबपाणी यांसारख्या घटकांचा समावेश असलेल्या उत्पादनांचा वापर लाभदायी ठरू शकतो. हे घटक त्वचेचा दाह होण्यापासून आराम देण्यासोबत हायड्रेशन देतात आणि या घटकांचा त्वचेवर उत्तम कूलिंग परिणाम देखील होतो. ते त्वचेचा दाह कमी करतात आणि त्वचेवर चट्टे येण्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये लाभदायी ठरू शकतात. म्हणून तुमच्या त्वचेला कडाक्याच्या ऊनापासून थंडावा मिळण्यासाठी हे घटक असलेल्या उत्पादनांचा वापर करा.

एक्सफोलिएट करा, पण त्याचा अतिरेक करू नका:
तुमची त्वचा आरोग्यदायी व कोमल राहण्याकरिता त्वचेमधील पेशी अथक मेहनत घेतात. अगोदर सांगितल्याप्रमाणे धूळ व प्रदूषणामुळे त्वचेवर दुर्गंधी जमा होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज व नीरस वाटू शकते. म्हणून एक्सफोलिएशन महत्त्वाचे आहे. यामुळे मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तेजस्वी दिसते. पण एक्सफोलिएटिंगचा अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ऑईल्स निघून जाऊन त्वचा कोरडी पडू शकते, ज्यामुळे त्वचा कडक होण्यासोबत त्वचेवर सुरकुत्या दिसू शकतात.

धूळ व प्रदूषणामुळे त्वचेवर दुर्गंधी व काजळी जमा होते, ज्यामुळे त्वचा निस्तेज व नीरस वाटू शकते. म्हणून एक्सफोलिएशन महत्त्वाचे आहे. यामुळे मृत पेशी निघून जातात आणि त्वचा आरोग्यदायी, कोमल व तेजस्वी दिसते. पण एक्सफोलिएटिंगचा अतिरेक टाळणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ऑईल्स निघून जाऊन त्वचा कोरडी पडू शकते, ज्यामुळे त्वचा कडक होण्यासोबत त्वचेवर सुरकुत्या दिसू शकतात.

तुमचे क्लीन्सर व मॉइश्चरायझर बदला:
हिवाळ्यादरम्यान आपल्यापैकी बहुतेक क्लीन्सर्सचा वापर करतात, जे त्वचा कोरडी होण्याला प्रतिबंध करण्यासाठी त्वचेला अधिक मॉइश्चराइझ ठेवतात. हीच बाब मॉइश्चरायझर्सच्या बाबतीत देखील आहे. पण उन्हाळ्यामध्ये हलक्या स्वरूपातील स्किनकेअर रूटिनचा, म्हणजेच हलके, नॉन-ग्रीसी क्लीन्सर व मॉइश्चरायझरचा वापर करणे सर्वोत्तम आहे. यामधून तुमच्या त्वचेमधील आवश्यक असलेले ऑईल्स निघून जाणार नाही याची खात्री मिळते. जलयुक्त हायड्रेटिंग जेल क्लीन्सर्स व मॉइश्चरायझर्स अनेकदा उपयुक्त ठरतात.

व्हिटॅमिन सी उपयुक्त:
व्हिटॅमिन सी उपयुक्त स्किनकेअर आहे. तुमच्या स्किनकेअर नित्यक्रमामध्ये याचा समावेश करता येऊ शकतो. हे सायंकाळनंतर तुमच्या स्किन टोनसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकते, उन्हाळ्यादरम्यान त्वचेला कोमल, तेजस्वी बनवू शकते. हे त्वचेवरील बारीक रेषा व सुरकुत्या देखील कमी करते आणि बाहेर ऊनामध्ये असताना त्वचेचे फोटोडॅमेजपासून संरक्षण करते; क्लीन्सिंगनंतर आणि माइश्चरायझरपूर्वी पोटेण्ट व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करण्याची शिफारस केली जाते.

स्किनकेअरसाठी अत्यंत उपयुक्त घटक म्हणजे एसपीएफ:
वर्षातील कोणत्या वेळी सनस्क्रिनचा वापर करणे टाळण्यासाठी कोणतेही कारण नसते आणि उन्हाळ्यादरम्यान हे तुमच्या ब्युटी बॅगेमध्ये असलेच पाहिजे. वर्षातील या ऋतूदरम्यान सूर्यकिरण अधिक प्रखर असतात, म्हणून त्वचेला कार्यक्षमपणे व्यापक संरक्षण देणाऱ्या दर्जेदार एसपीएफचा वापर करणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की, सनस्क्रिनचा कानांसह सर्व उघड्या भागांवर वापर केला पाहिजे. ओठांसाठी तुम्ही एसपीएफने युक्त लिप बामचा वापर करू शकता, जे तुम्ही उन्हाळ्यातील सुट्टीचा आनंद घेत असताना ओठांचे संरक्षण करेल.

तुमच्या त्वचेच्या प्रकाराला शोभणारे समर स्किनकेअर रूटिन पालन केल्यास त्वचा हायड्रेटेड राहण्यासोबत त्वचेला उत्तम पोषण मिळण्याची व तेजस्वी होण्याची खात्री मिळेल. तुम्हाला मेकअप करायची आवड असेल तर तुम्ही एसपीएफ असलेल्या फाऊंडेशन्स सारख्या उत्पादनांचा वापर करू शकता, ज्यामधून तुमच्या त्वचेचे अधिक संरक्षण होण्याची खात्री मिळते. पण स्किनकेअर व्यतिरिक्त आरोग्यदायी राहण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी पिणे आणि व्हिटॅमिन्स, मिनरल्स व फायबर्स संपन्न संतुलित आहाराचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे.

Summer Hot Skin Care Health Tips

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – वास्तू शंका समाधान – वास्तूचे ब्रह्म स्थान म्हणजे काय? तो कुठे असतो? तेथे काय असावे? काय नसावे?

Next Post

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा “व्हेरी गुड” श्रेणीत समावेश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा “व्हेरी गुड” श्रेणीत समावेश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011