नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील तापमान वाढत असून , अधिक वेळ उन्हात वावरल्यास उष्माघाताचा फटका बसू शकतो. उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जिथे शरीराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते आणि अत्यंत उष्ण हवामानामुळे शरीराचे तापमान सामान्य राखता येत नाही. साधारणपणे घाम आल्यावर आपल्या शरीराचे तापमान थंड होते पण इथे ते खूप जास्त राहते.
उष्माघात अत्यंत उन्हाळ्यात आणि दमट हवामानात होतो. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंतचे ऊन टाळा, उन्हात जावेच लागले तर डोके कान हे पांढरा रुमाल किंवा टोपीने झाका, थोडे-थोडे पाणी प्या, थोड्या-थोड्या वेळाने सावलीचा आधार घ्या आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या, असे आवाहन डॉ श्रीपाल शहा ,विषेशज्ञ न्यूरोलॉजी आणि इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक विशेषज्ञ.सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांनी केले आहे
अधिक ‘एक्स्पोजर’ धोक्याचे
‘सन एक्स्पोजर’ किती म्हणजेच दुपारी 12 ते ३ या कडक उन्हाच्या वेळेत किती वेळ उन्हात वावरता, कसे वावरता यावरही उन्हाचा त्रास होण्याशी संबंध आहे. कमी तापमान असेल म्हणजे ३८-४० अंशांच्या आसपास तापमान असेल आणि ‘एक्स्पोजर’ तासन् तास असेल, डोके व कान उघडे असेल आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत असेल तर उष्माघाताचा धोका वाढल्याशिवाय राहात नाही.
‘अशक्त किंवा किरकोळ प्रकृती, अधिक वयोमान, गर्दीमुळे (ओव्हरक्राऊडिंग) मोकळी हवा न मिळणे. उपवास करणे हे घटक उष्माघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच उच्चरक्तदाब व इतर आजारांमुळे शरीरायील पाण्याचे प्रमाण घटू शकते आणि अशी औषधे घेणार्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही
कडक उन्हात जावेच लागणार असेल तर साध्या ” कडक उन्हात जावेच किंवा, मीठ, साखर अस सरबत किंवा नारळ पाणी पिणे जास्त उपयुक्त ठरते. डोक्यावर थंड पाण्याचे कापड किंवा पट्ट्या ठेवणे, हाही उष्माघातात आपत्कालिन परिस्थितीतील उपाय ठरू शकते. अर्थात, त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचेच आहे.
गोड ज्युसने ‘डिहायड्रेशन’
उन्हाळ्यात गोड ज्युस हमखास घेतले जातात; परंतु निव्वळ गोड ज्युसमुळे उलट ‘डिहायड्रेशन’ होण्याची म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा गोड ज्युसेसऐवजी लिंबू पाणी, नारळ पाणी, ओआरएस घेण्याचे आवाहन केले.
कसा ओळखाल उष्माघात
– खूप तहान लागणे, श्वास घेण्यात अडचण
– अस्वस्थ वाटणे, लूज मोशन, चिडचिड
– अशक्तपणा जाणवणे
– पेटके ( क्रॅम्स) येणे
– डोकेदुखी, सतत घाम येणे, अत्यंत थकवा,
– शरीराचे तापमान वाढणे
– चक्कर येणे वा इतर त्रास होणे
अशी काळजी घ्या…
– पुरेसे पाणी प्या, तहान लागली नाही तरी दर किमान अर्ध्या तासाने पाणी प्या
– घराबाहेर पडताना डोके कान झाकण्यासाठी रुमाल, टोपी, छत्रीचा वापर करा
– छोट्या प्रवासातही पिण्याचे पाणी सोबत घ्या व थोड्या-थोड्या वेळाने आवर्जून प्या
– शरीरातील पाणी कमी झाल्यास ओआरएस, घरची लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, लिंबू-पाण्याचे सेवन करा
– गरोदर महिला व आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या
– दारू, चहा, कॉफी, कॅफेन असलेली व कार्बोनेटेड थंड पेये टाळा
– उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळा
– हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरा
– गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळा
हे नक्की करा
उन्हाळ्यात अधिक शारीरिक श्रम टाळणे गरजेचे असून, आयुर्वेदानुसार अनंतमूळ, बेलफळ, आवळा ज्यूस, कोकम सरबत, चांगले गुलकंद, नारळ पाणी व नारळाच्या अधिकाधिक पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त ठरते. तसेच खोबऱ्याच्या तेलाने रात्री मालीश करणे, रात्री काळे मनुके किंवा सब्जा पाण्यात भिजवून सकाळी सेवन करणे हेही पौष्टिकत्व देत शरीरातील तापमान कमी करतात. त्याचप्रमाणे शितली व शितकारी प्राणायाम, चंद्रभेदी व चंद्र अनुलोम-विलोम प्राणायाम हेदेखील शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हितकारी असल्याचे वैद्य विनय
कोण जास्त प्रभावित आहेत?
मुले
म्हातारी माणसे
उन्हाळ्यात काम करणारे रोजंदारी कामगार
लोक उन्हाळ्यात काम करतात किंवा प्रवास करतात.
जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात
जे लोक कमी प्रमाणात पाणी पितात
परिणाम:
उष्माघाताच्या रुग्णांचे वेळीच निदान आणि उपचार न केल्यास मेंदूचा झटका, हृदयविकाराचा झटका, किडनीला इजा होऊन मृत्यूही होऊ शकतो.गेल्या काही वर्षांत उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे भारतीय आकडेवारीवरून दिसून येते.
उष्माघाताचे निदान आणि उपचार कसे करावे?
उष्माघाताचे निदान झालेल्या व्यक्तीला थंड ठिकाणी हलवावे. ताबडतोब ओला टॉवेल किंवा बर्फाचा पॅक वापरल्याने शरीराचे तापमान कमी केले पाहिजे आणि व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात हलवावे.
Summer Heat Sun Stroke Sweet Juice Health