इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उन्हाळा ऋतू थंडावा मिळण्यासाठी दही, मसाला ताक, सरबत, उसाचा रस, थंड पेय यासारख्या पदार्थांची मागणी वाढते. त्याचप्रमाणे हे पदार्थ बाजारात तसेच घरगुती पद्धतीने देखील तयार करण्यात येतात. मात्र यामध्ये जलजीरा हादेखील अत्यंत रुचकर पौष्टिक पदार्थ आहे उन्हाळा सुरू झाला की, थंड जलजिऱ्याची मागणी खूप वाढते. फक्त लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही जलजीराची चव आवडते. जलजिऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि तो क्षणार्धात तयार होतो. घरी बनवलेल्या जलजीरामध्ये बाजारासारखी चव शोधत असाल तर या टिप्स वापरून पहा.
जलजीरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
– 125 ग्रॅम चिंचेचा कोळ,
– 3 चमचे पुदिन्याची पाने,
-1/2 टीस्पून (ग्राउंड) जिरे,
-¾ टीस्पून जिरे, चिरून 50 ग्रॅम गूळ,
– 4 टीस्पून काळे मीठ
1 टीस्पून किसलेले आले (स्वाद मीठ)
-3-4 चमचे लिंबाचा रस
– चिमूटभर लाल काश्मिरी मिरची
– 1.5 लिटर पाणी
-1/2 गरम मसाला
असा बनवा जलजीरा
जलजीरा बनवण्यासाठी प्रथम चिंचेचा कोळ, पुदिन्याची पाने, जिरे, गूळ, काळे मीठ, आले, लिंबाचा रस, लाल काश्मिरी मिरची आणि गरम मसाला मिक्सरमध्ये टाकून एकत्र बारीक करून घ्या. ही पेस्ट पाण्यात मिसळा आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी ग्लासमध्ये बुंदी टाकून जलजीरा सर्व्ह करा.