नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी मध्य प्रदेशातील इंदुर शहरातून सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या आणि १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची नियुक्ती झाल्याचे मेसज सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या नियुक्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. याअगोदरही सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्र व मध्य प्रदेशरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे मेसेज दोन वर्षापूर्वी व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकी दरम्यान सुध्दा त्यांच्या नावाची चर्चा होती. यावेळेस त्यांच्या राज्यपालपदाचे हे मेसज व्हायरल होत आहे. पण, त्याला अधिकृत कोणीच दुजोरा दिलेला नाही. विशेष म्हणजे हे मेसेज भाजपचे कार्यकर्ते सर्वत्र पोस्ट करत असून त्यात ते महाजन यांचे अभिनंदन करत आहे…
हा आहे मेसेज
मध्य प्रदेशातील इंदोर शहरातून सलग आठ वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या आणि १६ व्या लोकसभेच्या अध्यक्षा, आदरणीय श्रीमती सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्र च्या राज्यपाल म्हणून नियुक्ती ..!!
अभिनंदन ..!! अभिनंदन ..!! त्रिवार अभिनंदन ..!!