इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘बिग बॉस १६’ फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर खान ही सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सुंबूल सध्या उटी फिरायला गेली आहे. तेथील फोटोज, व्हिडीओ ती चाहत्यांसाठी नियमितपणे सोशल मीडियावर टाकत असते. नुकतीच तिच्यावर माकडाने हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. सुंबूलवर माकडाने हल्ला केला असून तिने इन्स्टाग्रामवरून त्याबद्दल माहिती दिली आहे.
‘इमली’ ही मालिका गाजवल्यानंतर अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ‘बिग बॉस १६’ मुळे पुन्हा चर्चेत आली. या सीझनमध्ये तिच्या खेळाचे खूप कौतुक केले गेले. या पर्वाची विजेती जरी ती ठरली नसली तरी तिने मोठा चाहतावर्ग नक्कीच कमावला. सध्या ती भटकंती करत असून तिची जिवलग मैत्रिण आणि अभिनेत्री उल्का गुप्तासोबत ती सहलीला गेली आहे. तिथेच सुंबुलसोबत दुर्घटना घडली. उटीला फिरायला गेलेली असताना सुंबुलला एका माकडाने ओरबाडले आणि त्यामुळे तिच्या हातावर ओरखडे उठले आहेत. सुंबुलने याचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नुकतेच सुंबुल तौकीरने मुंबईत नवीन घर घेतले आहे. लवकरच ती तिच्या नवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होणार असल्याने तिने फिरायला जाण्याचा बेत आधीच ठरवला होता. सुंबुलने सहलीचे फोटो शेअर केले आहेत. सुंबुल तौकीर खान या सहलीचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर दररोज शेअर करत आहे. नुकतीच ती फिरायला गेली असताना एका माकडाने तिच्या अंगावर झडप घालून तिला ओरबाडले. त्यामुळे सुंबुलला जखम झाली आहे. अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर झालेल्या जखमेसोबत माकडाचासुद्धा फोटो शेअर केला आहे. उल्कानेही तिच्या इन्स्टा स्टोरीबाबतचा एक मजेशीर फोटो शेअर केला.
एका फोटोत सुंबुलच्या पायाला झालेली जखम दिसत आहे. या फोटोवर ‘द आर्ट’ असे लिहिले आहे. तर दुसरा फोटो माकडाचा असून त्यावर ‘द आर्टिस्ट’ असे लिहिले आहे. या फोटोंसोबत एक पोस्टही आहे. यातूनही सुंबुलने आपल्याला माकडाने चावा घेतल्याचे सांगितले आहे. याशिवाय एक व्हिडीओ देखील आहे ज्यामध्ये सुंबुल आणि उल्का दिसत आहेत. हा व्हिडीओ हॉस्पिटलमध्ये बनवला आहे.
Sumbul Tauqeer Khan Injured Monkey attack