नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या सभेत मराठा समाजाचे नेते शेखर पगार यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली. ही धमकी व शिवीगाळ पगार यांच्या मोबाईल फोनवर रेकॅार्ड झाल्यानतंर त्यांनी सभा सुरु असतांना सर्वांना फोनवरुन आलेली ही धमकी माईकवरुन एेकवली. यात आमदार कांदे हे आई-बहिनीवरून शेखर पगार यांना शिवीगाळ देत असल्याचे समोर आले.
तर दुस-या एका घटनेत नांदगांव तहसिल कार्यालयात समीर भुजबळांचे पीए विनोद शेलार यांना दमबाजी व शिवीगाळ करतांना आमदार सुहास कांदे यांनी केली. यातही ते शिवीगाळ करत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे या दोन्ही ऑडिओ व व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या दोन्ही घटनेनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी या घटनेची निवडणूक आयोग, पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी केली.