मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार सुहास कांदे विरुध्द सुहास कांदे अशी लढत होणार आहे. नावाशी साधर्म्य असलेल्या एकाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी लोकसभेत असे नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिल्यामुळे काही उमेदवारांना त्याचा फटका बसला होता. तोच फॅार्म्युला नांदगावमध्ये वापरण्यात आला.
विशेष म्हणजे अपक्ष उभ्या असलेल्या सुहास कांदे यांच्या जीवाला असलेला धोका ओळखून पोलिसांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. यावेळी आमदार कांदे यांनी हा उमेदवार उभा करण्यामागे समीर भुजबळ असल्याचा आरोप केला.
नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाने सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.