रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुहास कांदे संतापताच भर बैठकीत अधिकाऱ्याला भोवळ

by India Darpan
जुलै 15, 2023 | 1:56 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
fainted mla new e1689366330940


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे ज्या अधिका-यावर संतापले त्या अधिकाऱ्याची बैठकीतच प्रकृती बिघडली. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी ही बैठक आटोपती घेतली. नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यावर कांदे संतापले होते. त्यांना अशक्तपणा आल्यामुळे भोवळे आल्याची माहिती पुढे आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत १२ कोटींचा नियतव्यय मंजूर असताना नांदगाव मतदारसंघातील एकाही गावासाठी निधी न दिल्याच्या कारणावरून आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्यावर संतापले. त्यानंतर त्यांच्यावर एका पाठोपाठ एक आरोप झाले. त्यामुळे गुंडे यांना सभागृहात भोवळ आली.

गुंडे यांच्यावर केले हे आरोप
कांदे यांनी गुंडे यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नांदगाव मतदारसंघातील ४८ पैकी एका गावालाही मंजूर नियतव्यय दिला गेला नाही. गुंडे यांचे ठेकेदारांशी लागेबांधे असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावर गुंडे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण कांदे यांचा संताप कमी झाला नाही. त्यानंतर त्यांना भोवळ आली. ही भोवळ आल्यानंतर सभागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. पण, या सर्व गोंधळामुळे पालकमंत्र्यांनी ही बैठक आटोपती घेतली.

या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले हे निर्देश
नाशिक – जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची निवड करतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून व त्यांच्याशी समन्वय ठेवून कामांचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. याबैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड. माणिकराव कोकाटे, मौलाना मुफ्ती मोहम्मद, सिमा हिरे, देवयानी फरांदे, सुहास कांदे, नितीन पवार, हिरामण खोसकर, ॲड.राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी हे यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शाळांची दुरूस्तीची कामे करण्यात आली आहेत, ती दुरूस्तीची कामे पाहणीसाठी दुसऱ्या विभागातील अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेत केलेल्या कामांची विधानसभा क्षेत्रनिहाय माहिती सर्व लोकप्रतिनिधींना येत्या आठ दिवसात उपलब्ध करून द्यावी. तसेच मॉडेल स्कुल म्हणून निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील 128 शाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची तालुकानिहाय सविस्तर माहिती तयार करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या निधी खर्चाबाबत आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 2022-23 करीता रुपये 600 कोटी, आदिवासी उपयोजनेतंर्गत रुपये 308.13 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रुपये 100.00 कोटी असा तिनही योजनांसाठी एकूण रुपये 1008.13 कोटी एवढा निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिला होता. या निधीपैकी मार्च, 2023 अखेर पर्यंत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रुपये 599.45 कोटी, आदिवासी उपयोजनेतंर्गत रुपये 308.13 कोटी, आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रुपये 99.78 कोटी असा तिनही योजनांचा एकूण रुपये 1007.36 कोटी एवढा खर्च झालेला आहे.

त्याचप्रमाणे 2023-24 यावर्षात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रुपये 680 कोटी, आदिवासी उपयोजनेतंर्गत रुपये 313.13 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत रुपये 100.00 कोटी याप्रमाणे एकूण रुपये 1093.13 कोटी एवढा नियतव्यय अर्थसंकल्पीत असून त्यापैकी आजपर्यंत रुपये 198.62 कोटी एवढा निधी शासनाने बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला आहे. बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या निधीपैकी आजपर्यंत तिनही योजनेंतर्गत एकूण रुपये 18.52 कोटी खर्च झाला असून या खर्चाची प्रत्यक्ष प्राप्त तरतूदीशी टक्केवारी 9.32% इतकी आहे. अशी माहिती यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जोशी यांनी सादर केली.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अपूर्ण (स्पिल) कामे तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. तसेच जी कामे पूर्ण झाली आहेत अशा कामांच्या स्पिल निधीची मागणी देखील तात्काळ करण्यात यावी. त्याचप्रमाणे 2023-24 हे वर्ष निवडणुकींचे वर्ष असल्याने आगामी काळात लागू होणाऱ्या संभाव्य आचारसंहितेचा विचार करता 2023-24 मध्ये मंजूर निधीतून घेण्यात येणाऱ्या कामांचे प्रस्ताव स्थानिक गरजा, कामांची निकड, कामांची प्राथमिकता व लोकप्रतिनिधींच्या मागणीची योग्य सांगड घालून सर्व तालुक्यांना न्याय मिळेल, अशा पध्दतीने खर्चाचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीला सादर करावेत. मार्च 2024 अखेर पर्यंत मंजूर निधी पूर्ण खर्च करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी कार्यान्वयीन यंत्रणांना दिल्या. या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी विविध विधायक सूचना मांडल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

Next Post

अजित पवार अर्थ खाते मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या घरी, हे आहे कारण

India Darpan

Next Post
ajit sharad pawar

अजित पवार अर्थ खाते मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या घरी, हे आहे कारण

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011