इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापनदिन पिंपरी चिंचवड येथे आज संपन्न झाला. यावेळी आयोजित मनसैनिकांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट कुंभमेळाव्याच्या पवित्र स्थानावर भाष्य करत खिल्ली उडवली. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. नाशिकचे आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज निर्वाणी आखाडा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे,
सुधीरमहाराज यांनी सांगितले की, राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळा वरती गंगेवरती जी काही टीका केली, ठाकरे भाषेमध्ये प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की, आपण ठाकरे भाषेत कशाचाही समाचार घेतला आणि आपण फार मोठे तत्ववेत ते झालो. तीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे दोन ते स्थानचे फरक आहे. ते तीर्थांची परीक्षा करू नये गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये. आणि बहुधा त्यांचे जे सहकारी यांच्याकडे पाणी घेऊन गेले ती चुकीची वेळ असेल त्यामुळे त्यांनी गांधीचे पाणी नाकारला असेल मला असं वाटतंय. धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडे टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आज ६५ कोटी लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले त्याचा श्रध्देचा राज ठाकरे अपमान करित आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे
मध्यंतरी मुंबईतल्या मेळाव्यात काही पदाधिकारी हजर नव्हते. त्या गैरहजर पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यातल्या काहींनी कारणं सांगितली की कुंभ मेळ्याला गेलो होतो. मी त्यांना म्हणलं इतकी पापं करता कशाला की जी धुवायला गंगेत जावं लागतं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. इतक्या लोकांनी अंघोळ केल्यावर गंगा कशी स्वच्छ राहील. असलं पाणी कोण पिणार? श्रद्धा समजू शकतो पण या देशातील एक नदी स्वच्छ नाही, नदीला आपण माता म्हणतो पण त्या नदीला आपण स्वच्छ ठेवत नाही. राजीव गांधी असल्यापासून गंगा साफ होणार असं ऐकतोय पण पुढे काय झालं? अंधश्रद्धेतून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी बाहेर यावं असे सांगितले.