गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उध्दव ठाकरे आणि राऊतांचं ते रेकॅार्डिंग माझ्याकडे….बडगुजरांनी पत्रकार परिषदेत घेत केला गौप्यस्फोट

by India Darpan
जून 5, 2025 | 6:37 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 9

इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, पक्षामध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करणे जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. गिरीश महाजन काय बोलले ते आम्हाला माहिती नाही. राऊतांनी मेसेज केला, मी पण त्याला रिप्लाय केला. काल माझ्याशी उध्दव ठाकरे, संजय राऊत बोलले. हा संवाद माझ्याकडे रेकॅार्ड आहे. मी ते रेकॅार्डिंग दाखवले तर वेगळं होईल, पण मी ते दाखवणार नाही. निवेदनाच्या बातम्या आल्यावर जिल्हाप्रमुखांच्या गाडीत बसले, तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मी पक्षाविरुध्द कोणतंही वक्तव्य केलेल नाही. मी जर ते केलेले असेल तर ते मीडियाच्या माध्यमातून पुढे आणावे. पण, संघटनात्मक बदल झाले तेव्हा नाराजी व्यक्त केली. काल उघडपणे बोलून दाखवले. तो जर गुन्हा असेल तर मी केलाय असा पुनरुच्चार त्यांनी केला.

यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयात आज काही नियोजित प्रवेश होते. पण, काही वैयक्तिक कार्यक्रमामुळे मी बाहेर आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयात जाऊ शकलो नाही असेही त्यांनी सांगितले. प्रवासात असतांना मला माहिती मिळाली. यापूर्वी माझ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नव्हती. पहिल्यांदा कारवाई झाली. निर्णय झाल्यानंतर संपर्क कसा साधतील. पक्षाच्या विरोधात काम केले असेल तर दाखवावं. विलास शिंदेच्या कार्यक्रमाला सगळे गेले, मी गिरीश महाजन यांच्या शेजारी उभा राहिलो म्हणून फोटो आला. म्हणून कारवाई केली. केलेल्या कारवाईवर मी नाराज नाही. मला एक वाक्य दाखवा जे मी पक्षविरोधी काम केले असेही ते म्हणाले.

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत हकालपट्टीची घोषणा
शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

दोन दिवसापूर्वी खा. संजय राऊत नाशिकमध्ये असतांना बजगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल त्यांनी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फुटीचे वारे वाहत असल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाने अगोदर ही कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत सुधाकर बडगुजर गैरहजर होते. तर महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचे उत्पन्नाचे नवे स्त्रोत विकसित होतील, जाणून घ्या, गुरुवार, ५ मेचे राशिभविष्य

Next Post

वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ…मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन

India Darpan

Next Post
वातावरण

वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ…मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011