नाशिक : विहीतगाव भागात सासरच्या जाचास कंटाळून नितू नवीनकुमार पांडे या विवाहीतेने गेल्या रविवारी आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीनकुमार पांडे,ब्रिजनाथ पांडे व कल्पना शुक्ला (रा.सर्व विठ्ठल मंदिराजवळ,विहीतगाव) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मृत महिलेचे वडिल संजय मिश्रा (मुळ रा.उत्तरप्रदेश हल्ली मनोरमानगर, ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर आत्महत्येस पतीसह सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप विवाहीतेच्या वडिलांनी केला आहे. २०१९ पासून सासरच्या मंडळीकडून तिचा छळ केला जात असल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.