नाशिक – आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयातील तरुण पोलिस शिपाई अक्षय आंधळे (२४) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय हा सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रहिवासी असून त्याची सध्या आडगाव येथील पोलिस मुख्यालयात नेमणूक होती. तो नाशिक येथे पत्नीसह राहत होता. पण, पत्नी दिवाळी निमित्त माहेरी गेली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी दुपारी पोलीस मुख्यालयातील बिल्डिंग नंबर १० मधील रुम नंबर ९ येथे अक्षयने गळफास घेत आत्महत्या केली. वर्षभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. अचानक त्याने हे पाऊल का उचलले, याबाबत आता आडगाव पोलिस तपास करत आहेत. त्याचा स्वभाव चांगला असल्याचे त्याचे सहका-यांनी सांगितले.