इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड या ३५ वर्षीय तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज शुक्रवार रोजी तातडीने लातूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे.
मंत्री छगन भुजबळ यांचे उद्या सकाळी १० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील स्वर्गीय भरत महादेव कराड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहे.
सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करुन कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी आरक्षणात संपुष्ठात येईल असे वाटल्यामुळे भरत कराड यांनी टोकाचं पाऊल उचलं आहे.