नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सासरवाडीच्या सततच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जावयास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू व दोन मेव्हण्यांविरोधात उपनगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सोहनपाल चटोले हे आत्महत्या करणा-या जावयाचे नाव आहे. तो पत्नी व मुलांसोबत देवळाली गावात वडारवाडी येथे राहत होता. दोन दिवसांपूर्वी पती व पत्नीमध्ये भांडण झाले होते. या भांडणानंतर उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी नितीन याने घरी जाऊन छताला गळफास घेत आत्महत्या केली.
नैराश्यातून आत्महत्या
आत्महत्या केलेल्या नितीन चटोले याचे दहा वर्षांपूर्वी वडनेर गेट येथील नेहा सुभाष बिडलान हिच्याशी लग्न झाले. त्यांना दोन अपत्य आहे. नेहाची आई मेहुणे हे लग्न झाल्यानंतर नेहमी संसारामध्ये हस्तक्षेप करत असल्यामुळे त्याचा त्रास नितीन होत होता. जून २०२१ मध्ये सर्वांसमोर बोलून त्याचा अपमान केल्याचे बोलले जाते. तेव्हापासून नितीन नैराश्यामध्ये राहत होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलेल जात आहे.