मुंबई – प्रेम आंधळे असते असे म्हणतात. पण या आंधळेपणातही प्रेमासाठी काहीही करण्याची एक उत्कट भावना असते. लैला-मजनू, हीर-रांझा अश्या कहाण्या आपल्याला सांगितल्या जातात. पण आधुनिक काळातही प्रेमाच्या कहाण्या निराळ्या आहेत. अलीकडेच बिहारमधील एका गावात प्रेयसीच्या दरवाज्यात आत्महत्या करून प्रियकराने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे.
पप्पू शर्मा नावाच्या तरुणाचे शेजारच्या गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी तो अचानक प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि लग्न रद्द करण्याची विनंती करू लागला. पण मुलीच्या कुटुंबियांनी नकार दिल्यामुळे त्याने तिथेच वीष प्राषन करून आत्महत्या केली. पप्पूच्या मावशीच्या घरी दोघेही भेटायचे. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाच्या शपथा घेतल्या. पण अचानक एक दिवस पप्पू आपल्या मित्रांसोबत प्रेयसीच्या घरी पोहोचला आणि लग्नाची मागणी घातली. मात्र प्रेयसीच्या आईने नकार दिला. त्याने तिच्या कुटुंबियांवर दडपण आणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते तयार झाले नाहीत. त्याचवेळी पप्पू शर्मा अचानक खाली कोसळला. त्याला रुग्णालयात भरती करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
खुनाचा आरोप
पप्पू शर्मा याच्या कुटुंबियांनी मुलीच्या कुटुंबियांवर खुनाचा आरोप केला आहे. आपल्या मुलाला वीष देऊन मारून टाकल्याचे त्याच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.