विकास गिते, सिन्नर
लहानपणी शाळेत असताना कधीकधी एक वेळची जेवणाची भ्रांत असताना अनेक मंगल कार्यालयात पोटाची भूक शमवली. लहानपणी परिस्थितीने शिकवले कसे जगायचे व अभ्यासाने शिकवले जीवनात पुढे कसे जायचे कधीकधी एक वेळची जेवणाची भ्रांत असताना अनेक ठिकाणच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोटाची आग अन्नाद्वारे विझवली. तर कधी जेवण मिळाले नाहीत तर पाणी पिऊन पोट भरले. लहानपणी परिस्थिती गरीब असल्याने अनेक ठिकाणी कामे केली व सेट उत्तीर्ण झालं परीक्षाची तारीख संपलेली असताना सुद्धा विलंब शुल्कासह फॉर्म भरण्याची सूचना रवींद्र कांबळेला एका शिक्षक मित्राने दिली. त्याचे फळ आज सेट उत्तीर्ण झाले. अक्षरशः जिद्दीचा व कष्टाच्या जोरावर यशानेही लोटांगण घातले रवीच्या पायावर. ही काही चित्रपटाची कथा नसून अक्षरशः सत्य-कथा आहे. सिन्नर शहरातील गावठाण भागातील तांबेश्वर येथील रविंद्र कांबळे मुलगा मिळेल ते काम करीत असे.
अक्षरशः भेळभत्ताच्या दुकानात तसेच हॉटेलमध्ये तसेच गाडीवर चालक म्हणून सुद्धा काम केले. मिळेल ते काम करण्यातच धन्यता मानणारा हा मुलगा अभ्यासासाठी जिथे मिळेल तिथे पुस्तक काढून अभ्यास करताना दिसत असे. जीवनात काहीतरी करायचे गरिबीचा हा कलंक पुसायचा लहानपणी बघितलेले दिवस पोटासाठी करावे लागणारे अनेक व्यवसाय त्यामधून शिकण्याची जिद्द अशा अनेक प्रसंगातून रवींद्र सेट उत्तीर्ण झाला . सगळ्यात जास्त *आनंद हा त्याच्या मातेला म्हणजेच आईला झाला. परीक्षा फॉर्मची मुदत शेवटच्याच दिवसाची असताना तरीही एका शिक्षक मित्राने विलंब शुल्कात फॉर्म भरण्याची सूचना रवींद्र कांबळे केली… फॉर्म भरला*, *तोही शेवटच्याच दिवशी… पण आईने धुणी भांडी करीत उपसलेले कष्ट आणि त्याच्या अभ्यासू वृत्ती व जिद्दीपुढे यशाने अक्षरश: लोटांगण घातले. ही यशोगाथा आहे*, सिन्नरच्या गावठा भागातील तांबेश्वरनगरमध्ये असलेल्या रवींद्र सेट परीक्षा उत्तीर्ण झाला.
तो प्राध्यापक होणार हे कळाल्यावर कांबळे कुटुंबात त्याच्या आईला सर्वाधिक आनंद झाला. हालाखीच्या परिस्थितीतून वाट काढणाऱ्या कुटुंबातील रवींद्र कांबळे या तरुणाची. रवींद्र कांबळे हा मूळचा राहुरी तालुक्यातील निम्हेरे तुळापूर गावचा रहिवासी. रोजगाराच्या शोधात कांबळे कुटुंबीयांनी गाव सोडले. २००८ साली. हे कुटुंब रवींद्रच्या मामाच्या गावी म्हणजे सिन्नरला आले. आई, वडील आणि दोन मुले असे चौकोनी कुटुंब. रवींद्रची आई घरोघरी धुणीभांडी करायची. तोही मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत शिक्षण घेत राहिला. भिकुसा विद्यालयात असतानाच कधीकधी जेवणाची दुपारची सुट्टी असताना व त्यातच डबा नसताना शेजारीच मंगल कार्यालयात लग्न असताना एका टाईम साठी जेवण केलेले आहे हे सांगताना रवी कधीही डगमगला नाही व परिस्थिती माणसाला काय शिकवते हे सुद्धा रवीने आपल्या शब्दांद्वारे सांगितले विशेष म्हणजे रवीने भेळ दुकानात काम करताना व अनेक हॉटेलमध्ये काम करताना कमीपणा घेतला नाही किंवा माझे शिक्षण कॉलेज पर्यंत झाले असून सुद्धा कधी कोणाला सांगितले नाही*
सिन्नर शहरातील भिकुसा हायस्कूल मध्ये दहावी आणि सिन्नर महाविद्यालयात संरक्षणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आईची दैनंदिन जुन्या भांड्यांची कामे दररोजच्या प्रमाणे चालू होती . रवीने सिन्नर शहरातील हॉस्पिटल तसेच भेळ भत्ता व अनेक हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती परिस्थिती माणसाला जीवनात काही शिकवते यावरून रवीने जिद्द सोडली नाही हॉटेलमध्ये काम करीत असताना सुद्धा शिक्षणाचे घमेंड चेहऱ्यावर आणले नाही पडेल ते काम मिळेल ती ती भाकरी हा रवी चा दिनक्रम होता त्यातच जीवनाची गाडी सुखदुःखाच्या चाकावर करत असताना अशातच आधुनिक तिच्या वाहनावर शहरातील चालक म्हणून गाडीवर काम चालू केले गाडीवर जात असताना व अनेक भाडे मारतांना गाडीतच सीटवर आपली शिक्षणाची पुस्तक घेऊन अभ्यास करत होता कुठे जरी गाडी थांबली असता रवी आपले पुस्तक काढून वाचत असे शिक्षणाची धडपड बघून अनेक नागरिक त्याच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले दिवसभर अनेक कामांची सर बती व रात्री शिक्षणाचे धडे यातच रवीचे दिवस जाऊ लागले.
त्यातील अभ्यासाची गोडी व सुशिक्षित मित्रांनी केलेली मदत कार्य यासाठी त्याला शिक्षणाची कवाडे खुले दिसू लागले. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सप्टेंबर 20 21 मधील झालेल्या राज्य पात्रता परीक्षा सेट मध्ये संरक्षण शास्त्र विषय घेत यश संपादन केले त्यातच पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्सर रवीने शिक्षणात मारल्याने अर्थातच रवीने पहिल्याच प्रयत्नात सेट उत्तीर्ण केल्याने त्याच्या कौतुकाला पारावार उरला नाही खरेतर गरीबा चे चटके व शिक्षणाचे महत्व रवीला ऐन तारुण्यात समजले होते कारण काही तरुण पिढी शिक्षणाची द्वारे खुली असतानासुद्धा अनेक मार्गाला लागलेल्या दिसत आहे रवींद्र कांबळे या होतकरू तरुणाला सिन्नर मधील अनेक नागरिकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन व समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे दवाखाने, हॉटेलात काम करता करता, खासगी वाहनांवर ड्रायव्हर म्हणूनही काम केले. गाडी जिथे थांबेल तिथेच पुस्तक उघडायचे आणि अभ्यास सुरू व्हायचा. दिवसभर काम आणि रात्री अभ्यासासाठी वेळ काढावा लागत असे. त्याच्यातील जिद्द आणि अभ्यासाची गोडी लक्षात घेत सुशिक्षित मित्र मंडळीनेही मार्गदर्शन केले*.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) मध्ये संरक्षणशास्त्र विषय घेत यश संपादन केले आहे. रवींद्र कांबळे याने पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळविले. त्यामुळे कौतुक होत आहे. रवींद्रला सिन्नर येथील जी. एम. डी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. व्ही. पवार, प्रा. दीपक खुरचे, राजू कांबळे, भैरवनाथ हायस्कूल शहा येथील शिक्षक रवींद्र कोकाटे, गणेश कांबळे, प्रा. देवीदास हारदे व सगर विद्या प्रसारक संस्थेचे संचालक सुधाकर गोळेसर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन यांच्यासह समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे*.
*रवींद्र कांबळे हा मुलगा सेट उत्तीर्ण झाल्याने सिन्नर शहरातून तसेच अनेक विद्यार्थ्यांकडून रविंद्रा चे अभिनंदन होत आहे तसेच त्याने या कष्टाच्या जोरावर शिक्षणाचे द्वारे खुली केली अशा या रविंद्रा ला भेटण्यासाठी अनेक विद्यार्थी फोनद्वारे तसेच समक्ष रवींद्र ला भेटत आहे कारण शिक्षणाला प्रोत्साहन करण्यासाठी खारीचा वाटा हा रविंद्रा च्या आईचा आहे कारण दिवसभर धुणीभांडी करून रवींद्र च्या आईने रवीला परिस्थितीची जाण करून दिली तसेच रवीने पण आईला व परिस्थितीला सामावून शिक्षणासाठी मिळेल ते काम व मित्रांचे सहकार्य वेळोवेळी घेत राहिला अशा या रवींद्र कांबळे च्या यशाबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे*