रविवार, सप्टेंबर 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

झेडपीच्या शाळेत शिक्षण ते थेट कृषी क्षेत्रात आचार्य; गिरणारेच्या तरुणाचा भन्नाट प्रवास

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 5, 2021 | 6:39 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211105 WA0001

दीपक चव्हाण, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील डॉ. गणेश राणू लहाने यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची आचार्य पदवी (Ph. D) मिळाली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते पदवी अनुग्रहित करण्यात आली. कृषी मधील अनुवांशिक शास्त्र आणि वनस्पती प्रजनन ( Genetics & Plant breeding) या विषयामध्ये त्यांना आचार्य पदवी ( Ph.D ) प्रदान करण्यात आली. ( Cytological & molecular analysis in trispecies derivatives of cotton )असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.

गणेश लहाने यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी गिरणारे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. नंतरचे शिक्षण ५ वी ते १२ वी पर्यंत जनता विद्यालय हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इगतपुरी येथे झाले. बारावीनंतर त्यांनी कृषी ( Agriculture ) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तळेगाव दाभाडे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, येथे २००६ मध्ये प्रवेश मिळाला. इथूनच खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. कॉलेज फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी शैक्षणिक कर्ज काढून २०१० साली बी. एस्सी शिक्षण पूर्ण केले. नंतर एम.एस्सी ( कृषी ) Genetics and Plant breeding ला प्रवेश मिळविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सुयश मिळवून देशामध्ये ११८ वा क्रमांक मिळविला.

नंतर त्यांचे प्रवेश एम. एस्सी ( कृषी ) Genetics and Plant breeding या विषया मध्ये २०११ मध्ये गुजरातमधील सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ पालनपुर, गुजरात येथे झाला. तिथे त्यांना डॉ. आर. एम. चौव्हान यांचे मार्गदर्शन लाभले. २०१३ ध्ये त्यांचे एम. ए.स्सी ( कृषी ) चे शिक्षण पूर्ण झाले. त्यांना तेंव्हाच आचार्य पदवी ( Ph.D ) ला प्रवेश घ्यायचा होते. पण बी. एस्सी ( कृषी ) ला घेतलेले शैक्षणिक कर्ज भरायचे असल्यामुळे त्यांनी शिक्षणं तात्पुरते सोडले. दरम्यान त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक ( Assistant Professor ) म्हणून नोकरी केली. कर्ज उतरत आल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये आचार्य पदवी ( Ph.D ) साठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवत महाराष्ट्रमध्ये तिसरा क्रमांक मिळविला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आचार्य पदवी ( Ph.D ) Genetics and Plant breeding या विषया मध्ये प्रवेश मिळाला. तेव्हा पण त्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागले. फी जास्त असल्यामुळं त्यांनी यावेळेस कर्ज न काढता बी. एस्सी व एम. एस्सी मधील जवळच्या मित्रांकडून उसने पैसे घेतले. घरच्याकडून मदत घेतली. फी भरण्याची व्यवस्था झाली होती पण त्यांचे संशोधन कार्य हे नांदेड येथे कापुस संशोधन केंद्र येथे सुरू होते. तेव्हा ते रोज सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी दिनचर्या करत असे. त्यासाठी लागणारे खर्च कपात करून कसे तरी ३ वर्ष काढली. काही संशोधनाचा काळ नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्था येथे काढला. संशोधन कार्य संपल्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी, विद्यापीठ, परभणी येथे येऊन थेसिस (प्रबंध ) सादर केला. आचार्य पदवी (Ph.D) चे मार्गदर्शक म्हणून डॉ. के.एस. बेग यांचे मार्गदर्शन लाभले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे भाऊबीज; असे आहे महत्त्व आणि मुहूर्त

Next Post

तात्काळ कामावर रूजू व्हा; उच्च न्यायालयाने संप करणा-या एसटी कर्मचाऱ्यांना दिले आदेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, २१ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 20, 2025
cricket
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये नोव्हेंबर मध्ये दोन रणजी सामन्यांचा थरार….हे सामनेही होणार

सप्टेंबर 20, 2025
crime1
क्राईम डायरी

अनैतिक संबधाच्या संशयातून परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

सप्टेंबर 20, 2025
rajanatsing
राष्ट्रीय

संरक्षण मंत्री या तारखे दरम्यान मोरोक्कोला देणार भेट…दोन दिवसाचा दौरा

सप्टेंबर 20, 2025
rape
क्राईम डायरी

चार महिन्यापासून महिलेच्या मोबाईलवर अश्लिल फोटो, व्हिडीओ व संदेश पाठवले…गुन्हा दाखल

सप्टेंबर 20, 2025
fir111
क्राईम डायरी

नाशिकमध्ये दिग्दर्शक असलेल्या तरुणाची साडेपाच लाख रूपयांची अशी केली फसवणूक

सप्टेंबर 20, 2025
Screenshot 20250920 151721 WhatsApp 1
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडाकडून पत्रकारांना बेदम मारहाण…काठी व दगडाचा वापर

सप्टेंबर 20, 2025
cbi
संमिश्र वार्ता

CBI ने या स्पर्धा परिक्षा घोटाळ्यातील भरती प्रकरणी पाच आरोपींना केली अटक…IAS सह उच्च अधिकारी जाळ्यात

सप्टेंबर 20, 2025
Next Post
court 1

तात्काळ कामावर रूजू व्हा; उच्च न्यायालयाने संप करणा-या एसटी कर्मचाऱ्यांना दिले आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011