इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जिद्द असेल तर मनुष्य कोणताही विश्वविक्रम करू शकतो, मग कोणतेही अडथळे आले तर ते पार करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते, ऑस्ट्रेलियन अॅथलीट डॅनियल स्काली या तरुणाबद्दल देखील असेच सांगता येईल. त्याने एका तासात 3,182 पुश-अप करत नवा विक्रम केला आहे.
डॅनियल्सच्या या नव्या विक्रमासह जराड यंगचा विक्रम मोडीत निघाला आहे. जराडने 2021 मध्ये 3,054 पुश-अप करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. जे डॅनियलने तोडले आहे. डॅनियलचे वैयक्तिक आयुष्य खूप कठीण गेले आहे. वयाच्या १२व्या वर्षापासून ते कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम या आजाराने त्रस्त आहेत. ही अशी वेदना आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. या अपघातानंतर ही वेदना सुरू झाली, जी आजही कायम आहे. हा असा आजार आहे ज्यामध्ये मेंदू हातांना चुकीचा संदेश देतो.
याबाबत डॅनियल म्हणतो, या वेदनेमुळे माझे जगणे कठीण झाले. असाध्य वेदनेमुळे त्याला अनेक वेळा बाहेर जाता येत नव्हते. कधीकधी वेदना कमी करण्यासाठी काही महिने रुग्णालयात दाखल करावे लागते. तथापि, शरीराच्या वर्कआउट्सद्वारे, शरीर त्याच्याशी लढण्यास सक्षम होते. तसेच डॅनियल सांगतो, व्यायामाच्या मदतीने शरीर इतके मजबूत झाले आहे की, वेदनांचा प्रभाव कमी जाणवतो. मला माझे दुःख, तणाव आणि आयुष्यातील अडचणी मागे टाकून आयुष्यात पुढे जायचे होते.
https://twitter.com/GWR/status/1539239462965755907?s=20&t=9x4EbFL1ZkmVFx8kGAMKZA
डॅनियलचा हा पहिला विक्रम नाही. त्याने याआधी सर्वात जास्त काळ पोटाची फळी करण्याचा विक्रम केला आहे. डॅनियलने 2021 मध्ये 9 तास, 30 मिनिटे आणि एक सेकंद प्लँकिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही दोनदा नोंद केली.
ऑस्ट्रेलियन ॲथलिट डॅनिएल स्कॅली हे त्याचं मूर्तिमंत प्रतीक होय. गंभीर आजार असतानाही त्याने एक सोडून दोन-दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. डॅनिएलनं एका तासात तब्बल ३१८२ पुशअप्स काढले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली, पण त्याचा हा विक्रम अल्पायुषी ठरला. काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या कार्तिक जयस्वालनं डॅनिएलचा हा विक्रम मोडताना ३३३१ पुशअप्स काढले.
विशेषत: सिक्स पॅक ॲबसाठी जो व्यायाम अतिशय महत्त्वाचा मानला जातो, त्या ‘ॲबडॉमिनल प्लँक’मध्येही डॅनिएलनं जागतिक विक्रम केलाय आणि त्यासाठीही त्याचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदलं गेलंय. हा विक्रमही त्यानं गेल्यावर्षीच म्हणजे ऑगस्ट २०२१मध्ये केलाय. केवळ एक-दोन मिनिट ‘प्लँक’ करतानाही भल्याभल्यांची भंबेरी उडते आणि ‘थरथर’ होते. तिथे डॅनिएलनं तब्बल नऊ तास तीस मिनिटे आणि एक सेकंद इतका वेळ प्लँक करून इतिहास रचला.
जॉर्ज हूडचा विक्रम त्यानं तब्बल एक तासानं मोडला. कारण डॅनिएल अतिशय जिद्दी होता. त्याने या दुखण्यावर मात करण्यासाठी व्यायाम करायला सुरुवात केली. डॅनिएलच्या वेदना कायमच होत्या; या महाभयानक दुखण्यावर आणि दुर्धर आजारावर मात करत त्यानं जागतिक विक्रमाला गवसणी घातली, यामुळेच या विक्रमाचे महत्त्व जास्त आहे.
Success Story of athelete Daniel Scali World Record Push Ups