कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालूक्यातील ककाणे शिवारातील कैलास पगारे या शेतक-याच्या शेतात शिकारीच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विहिरीतून बिबट्याचा आवाज येत असल्याच लक्षात येताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाची टीम पथकासह घटनास्थळी पोहचल्यावर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी परिसरातील नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.