अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील चणकापूर, पुणंद या धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने गिरणा नदीला मोठा पूर आलेला आहे. अशाच पुराच्या पाण्यातून एक ट्रॅक्टर चालकाने स्टंट करत पुरातून ट्रॅक्टर चालवत पलीकडच्या बाजूला आणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कळवण तालुक्यातील कुठल्या भागातील आहे हे मात्र समजू शकले नाही. मात्र कांदा विक्रीसाठी हा तरुण जात असल्याचे सांगितले जात आहे.