नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथील सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला प्रगत स्ट्रोक सेंटर्ससाठी जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) व एनएबीएच (NABH) कडून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. एप्रिल २०२५ मध्ये रुग्णालयाच्या सेवा,सुरक्षा व गुणवत्ता या मधील कठोर मूल्यांकनानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. यामान्यतेमुळे सह्याद्रि हॉस्पिटल्सची गणना देशातील अशा प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अव्वल तीन रुग्णालयांमध्ये झाली आहे.
आज जागतिक पातळीवर ब्रेनस्ट्रोक हे मृत्यूचे दुसरे तर अपंगत्वाचे तिसरे प्रमुख कारण ठरत आहे. भारतात दरवर्षी सुमारे १८ लाख लोक स्ट्रोकला बळी पडतात. त्यापैकी अंदाजे ५.५ लाखांचा मृत्यू होतो. स्ट्रोकमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम अतिशय तीव्र असतो. स्ट्रोकच्या उपचारामध्ये ‘गोल्डनअवर’, म्हणजेच लक्षणे दिसल्यानंतरची पहिली ६० मिनिटे, फार महत्वाची असतात. याकाळात त्वरित वैद्यकीय हस्तक्षेप झाल्यास रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होते. म्हणूनच, वेळेत व गुणवत्ता पूर्ण उपचार देणारे रुग्णालय हेच रुग्णासाठी जीवनदायी ठरते, आणि एनएबीएच प्रमाणपत्र मिळणे ही त्या सेवांची सर्वोत्तम मान्यता आहे.
सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक येथे समर्पित तज्ञ डॉक्टर्स, डेडिकेटेड न्यूरोआयसीयू व अनुभवी स्टाफ इ. त्याशिवाय येथे मेंदूविकारविभागाचे इंटरव्हेशनलन्यूरॉलॉजिस्ट अँड स्ट्रोकस्पेशालिस्ट डॉ. श्रीपाल शहा यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी स्ट्रोक रुग्णांसाठी एक विशेष टीम आहे. हि टीम स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीवर जलद आणि प्रभावी उपचार करण्यात विशेषज्ञ आहे. रुग्णालय थ्रोम्बोलिसिससाठी स्थापित मानकांचा वापर करत स्ट्रोकचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. याबरोबरच, सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये यांत्रिक थ्रोम्बेक्टोमीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, ज्या रुग्णांच्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या काढण्यासाठी वापरल्या जातात. असे उपचार हे तज्ञ क्लिनिकल टीमद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.
सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक येथे अनुभवी डॉक्टर्स, समर्पित न्यूरोआयसीयू, कुशल वैद्यकीय कर्मचारी आणि मेंदूविकार विभागाचे इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट व स्ट्रोक स्पेशालिस्ट डॉ. श्रीपाल शहा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत विशेष स्ट्रोक टीम उपलब्ध आहे. ही टीम स्ट्रोकच्या आपत्कालीन परिस्थितीत जलद व परिणामकारक उपचार करण्यात तज्ज्ञ आहे. रुग्णालयात थ्रोम्बोलिसिस प्रक्रियेसाठी स्थापित राष्ट्रीय मानकांचे काटेकोर पालन केले जाते आणि यासोबतच मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज सुविधा उपलब्ध आहेत, ज्या मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी वापरल्या जातात. असे उपचार हे तज्ञ क्लिनिकल टीमद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केले जातात.
सह्याद्रि हॉस्पिटल्सला जागतिक स्ट्रोक ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएसओ) समितीकडून देखील मान्यता मिळाली आहे. हि समिती विशिष्ट निकषांनुसार प्रभावी डेटा प्रदान करणाऱ्या आणि उच्च दर्जाची काळजी व उपचार देणाऱ्या रुग्णालयांना मान्यता देते. इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट अँड स्ट्रोक स्पेशालिस्ट डॉ. श्रीपाल शहा म्हणाले, “एनएबीएच प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे केवळ उच्चमानकांची पूर्तता न करता त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करून आरोग्यसेवेत नवीन मापदंड स्थापित करणे.”
हॉस्पिटलचे उपाध्यक्ष संजय चावला म्हणाले कि,”एनएबीएच’ मान्यता घेण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या काळजीसाठी तसेच, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी असलेल्या आमच्या अथक समर्पणाचे प्रतिबिंब आहे. भारतातील अशा काही मोजक्या रुग्णालयांपैकी एक होण्याचा आम्हाला अभिमान आहे.”