नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देश विदेशातील अनेक नामवंत अॅथलिट्सनी सहभाग घेतलेल्या हाय्रॉक्स दिल्ली २०२५ स्पर्धेत स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक संघाने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. ८ फंक्शनल वर्कआउट स्टेशन आणि १ किमी धावणे अशा आठ फेऱ्यांच्या असे ८ किमी या जागतिक दर्जाच्या फिटनेस रेस फॉरमॅटमध्ये, स्ट्रायकींग स्ट्राइडर्सच्या खेळाडूंनी अनेक गटांमध्ये विजयी ठरून नाशिकचा झेंडा पुन्हा उंचावला.
हाय्रॉक्स मुंबईनंतर आता दिल्ली स्पर्धेत देखील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पुढील यश संपादन केलं आहे.
हाय्रॉक्स दिल्ली २०२५ – सर्वोच्च कामगिरी:
अलिसगर आदमजी आणि शीतल संघवी -वेळ: १:२९:३०
मिश्र डबल्स (वयोगट ५०-५५) – प्रथम क्रमांक
डॉ. धनंजय डुबेर्कर आणि विक्रांत आव्हाड
वेळ: १:२५:१९
डबल्स (वयोगट ४०-४५) – द्वितीय क्रमांक
प्रशांत डबरी वेळ: २:०५:५५
सिंगल्स (वयोगट ६०-६५) – द्वितीय क्रमांक
अमोल करंजकर वेळ: १:३३:३७
सिंगल्स (वयोगट ४०-४५) – तृतीय क्रमांक
संघाचे इतर सहभागी व त्यांची कामगिरी:
ऋत्विक काठे– १:२४:१८
महेंद्र छोरिया आणि दीपाली गलांडे – १:५२:४१
डॉ. इंद्रजीत घोडके – १:५२:२४
डॉ. सागर पाटील – २:०१:२४
गणेश ढाकणे आणि सुरजीतसिंह कोहली – २:०६:१६
या कठीण आणि शारीरिक-मानसिक क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या स्पर्धेत संघाच्या प्रत्येक सदस्याने उत्कृष्ट तयारी, चिकाटी आणि संघभावना दाखवली.
या यशामागे मुख्य प्रशिक्षक अलिसगर आदमजी यांचे प्रभावी प्रशिक्षण आणि नाशिकमधील Yash Inovate, V-Fitness आणि Ironsport येथील कठोर सरावाचे योगदान आहे. संघाच्या मागे उभ्या राहिलेल्या फिटनेस प्रेमी, मार्गदर्शक,स्ट्राइकिंग स्ट्राइडर्स चे इतर सभासद,तज्ज्ञांच्या समर्पित पाठिंब्यामुळेच हे यश शक्य झाले.
स्ट्रायकींग स्ट्राइडर्स – नाशिकचा फिटनेसचा नवा चेहरा हाय्रॉक्स दिल्ली २०२५ मधील यश हे स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक संघाच्या शिस्तबद्ध तयारीचे आणि एकत्रित प्रयत्नाचे प्रतीक आहे. केवळ नाशिकपुरते मर्यादित न राहता, हा संघ आता संपूर्ण भारतात फिटनेस प्रेरणेचा केंद्रबिंदू ठरत आहे.