मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कळवणला तीन तास रास्ता रोको; हे आहे कारण

ऑक्टोबर 10, 2022 | 5:34 pm
in स्थानिक बातम्या
0
20221010 172703

कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण मानूर रस्त्यावरील पुलावर ९ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद म्हणून आज व्यापारी असोसिएशन व कळवण शहरातील त्रस्त नागरिक नागरिकांनी संभाजी नगर गावठाण परिसरात सकाळी ९ वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्तेकामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता यांचे विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

व्यापारी असोसिएशनच्यावतीने देण्यात निवेदनात म्हटले आहे की, कळवण शहरातून जाणाऱ्या मेनरोडचे काम अडीच ते तीन वर्षांपासून सुरु आहे. या कामाबाबत अनेक राजकीय पक्ष, संघटना, व्यापारी असोसिएशन यांनी वेळोवेळी आंदोलन करून काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी संगनमताने विलंब करीत आहेत. या दिरंगाईमुळे रस्त्याची एकतराफा वाहतूक सुरु आहे. यामुळे कळवणकर व बाहेरील वाहनचालकांना हकनाक वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. यामुळे छोटे अपघात वाहन चालकांमध्ये वादविवाद नित्याचेच झाले आहेत. व्यापारी असोसिएशनने केलेल्या आंदोलनावेळी संबंधित कार्यकारी अभियंता यांचे उपस्थितीत ठेकेदाराने ४५ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र साडे २चार महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या तालुक्यात केंद्रीय राज्यमंत्री व आमदार असून पोरका झाला असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आदिमाया श्री सप्तशृंगी देवीचा नवरात्रौउत्सव सुरु आहे. काल दि ९ सप्टेंबर रोजी कोजागिरी पौर्णिमा असल्याने देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने पुलले आहेत. असे असतांना स्थानिक पोलिसांकडूनही वाहतुकीचे नियोजनाचा अभाव नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. ह्या मेनरोडचे काम एकदिवस नक्की एखादा बळी घेईल अशी चर्चा असतांना काल सायंकाळी यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अजय येवले आपल्या घरून अल्पबचत कलेक्शनसाठी निघाले असतांना बेहडी नदीच्या पुलावर साक्री डेपोच्या बस क्रमांक एम एच २० बीएल २४९८ या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत जात याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या अजय येवले, प्रकाश भोये व एक भाविक या तिघांनाही चिरडले घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता अजय येवले याना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तर प्रकाश भोये याना अधिक उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठवले भोये यांचाही नाशिककडे जात असताना रस्त्यात मृत्यू झाला. मात्र तिसरा जखमी व्यक्ती कोणत्या दवाखान्यात उपचारासाठी गेला याबाबत कोणालाच माहिती नसल्याचे समजते. याबाबत कळवण पोलिसात मोटर अपघात बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान आज संतप्त व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी आज आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवत सकाळी ९ वाजता संभाजी नगर परिसरात कळवण नाशिक रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी सदर अपघातास जवाबदार असणाऱ्या बस चालक, रस्ते कामाचे ठेकेदार व कार्यकारी अभियंता यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. बराचवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना निवेदन देण्यात आले. दोनही बाजूची दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात व्यापारी असोसिएशनचे मोहनलाल संचेती, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, माजी जिप सदस्य शैलेश पवार, माजी नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, छावा संघटनेचे प्रदिप पगार, माकपाचे सरचिटणीस मोहन जाधव, शिंदे गटाचे जितेंद्र पगार, शरद पगार, रोटरी क्लबचे सेक्रेटरी रविंद्र बोरसे, लक्ष्मण खैरनार, भाजपचे विकास देशमुख, संदीप अमृतकार यांचेसह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
त होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उरण वायु विद्युत केंद्रातील दुर्घटनेत कामगारांचा मूत्यू; संतप्त ग्रामस्थांची गेटवर धडक

Next Post

इगतपुरी-कसारा दरम्यान नवी रेल्वेलाईन आणि बोगद्याच्या डीपीआरसाठी पावणेनऊ कोटी रूपये मंजूर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
railway line e1657722545955

इगतपुरी-कसारा दरम्यान नवी रेल्वेलाईन आणि बोगद्याच्या डीपीआरसाठी पावणेनऊ कोटी रूपये मंजूर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011