मुंबई – राज्य सरकारने अखेर दीड वर्षांनंतर राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष घोषित केला आहे. या पदासाठी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. चाकणकर हे या उद्या पदभार घेणार आहेत. या निवडीचे पत्र चाकणकर यांना मिळाले आहे.
विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडी सरकारने या पदावर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. राज्यात महिला असुरक्षित असून आयोगाला अध्यक्ष नसल्याचे सांगत विरोध असलेल्या भाजपने सरकारवर चांगलेच आसूड ओढले. अखेर सरकारने चाकणकर यांची निवड केली आहे.