शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या शहरात २१ ऑगस्टपासून ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव

by India Darpan
ऑगस्ट 18, 2024 | 10:48 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
100 1140x570 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे ५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे खरेदी करता यावे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती मिळावी या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्र सामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यांसह अनेक कृषी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्याकडून तयारीचा आढावा व पाहणी
मंत्री श्री. मुंडे यांनी परळी येथील शासकीय विश्रामगृहात कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी विभागाचे सह संचालक श्री. दिवेकर, श्री. मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे , तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह कृषी, महसूल पोलीस अधिकारी उपस्थित होते.

परळी शहरातील बाजार समिती मैदानावर सुरु असलेल्या कृषी महोत्सवाच्या तयारीची मंत्री श्री. मुंडे यांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हे गाव राज्यातील पहिले सौरग्राम…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

Next Post

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन महात्म्य…

Next Post
raksha bandhan 1 e1724002155327

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन महात्म्य…

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011